Monday, July 22, 2019

ज्योतिष मर्म # १९ - विमशोत्तरी दशा आणि फळ. - शंतनू जोशी



ज्या लोकांना ज्योतिष विषयक माहिती नाही अश्यांना 'महादशा' म्हणले कि धस्स होतं !   त्यांना साडे साती प्रमाणे महादशा म्हणजे काहीतरी मोट्ठे संकट असे वाटते . मुळात साडे साती सुद्धा सगळ्यांसाठी संकट ठरत नाही तसेच महादशा सुद्धा ठरत नाही.  मुळात साडे साती हि फक्त आपल्या चंद्र राशी चा आधारे असते आणि शनीचा ट्रान्सीट/गोचर भ्रमणा नुसार असते.   पण महादशा हि त्याहून खूप सशक्त आणि मूलभूत संकल्पना आहे.

विमशोत्तरी दशा म्हणजे महादशा , अंतर दशा आणि प्रत्यंतर दशा, त्याचा पुढे सूक्ष्म दशा आणि प्राण दशा.   आपल्या जन्माचा वेळी चंद्र ज्या नक्षत्रात होता त्या नक्षत्र स्वामीची महादशा तुम्हाला जन्माचा वेळी होती.  आणि मग आपण जसे मोट्ठे व्हाल तसे विशिष्ट सिक्वेन्स मधे एका मागे एक सर्व ग्रहांचा दशा आपल्याला लागू होत जातात.  ज्योतिष शास्त्रामधे आपल्या आयुष्याचे भविष्य कथन करायचे असेल तर आधी तुमचा आयुष्याचा काळ विभागता आला पाहिजे. विभाग केल्या शिवाय आपण एखादी घटना नेमकी कधी घडेल हे सांगू शकणार नाही.  त्या मुळे विमशोत्तरी दशा पद्धती हि ज्योतिषाचा पाया मानली पाहिजे.  विशिष्ट ज्योतिषीय गणितानुसार हे प्रत्येक ग्रहासाठी निश्चित केलेले वेग वेगळे (unequal) कालखंड हेच खरे तर फलज्योतिषचा पाया आहेत. 

तर मुळात विमशोत्तरी म्हणजे १२० वर्षांचा काल खंड.  मग त्या काल खंडाचे प्रत्येक ग्रहाचा गणितानुसार ९ विभाग केले जातात,  त्यांना महादशा असे म्हणले जाते.  ह्या महादशेत पुन्हा ९ विभाग केले जातात त्यांना अंतर दशा म्हणतात.  आणि अंतर्दशेचे पुन्हा ९ विभाग केले जातात ज्यांना प्रत्यंतर दशा म्हणले जाते.  आणि मग तशाच प्रमाणे पुढे सूक्ष्म आणि प्राण दशा सुद्धा असतात.  मग तदनुसार तुम्हाला त्या त्या कालखंडात त्या त्या ग्रहांचे परिणाम मिळणार. ग्रहांचे फळ हा एक स्वतंत्र विषय आहे त्यावर पुन्हा केव्हा तरी.

काळजी नसावी
शंतनू जोशी

No comments:

Post a Comment