Wednesday, September 18, 2019

गुरु मंत्र - शंतनू जोशी

भित्र्या, आळशी आणि फुकट्या माणसाला आयुष्यात कधीच, कुठल्याच बाबतीत यश मिळू शकत नाही. भित्र्याचा मंगल खराब , आळशी माणसाचा शनी खराब आणि फुकट्या माणसाचा केतू खराब. ज्या माणसाचे पत्रिकेत हे तीन ग्रह शुभ आहेत अश्यानी सुद्धा, जर वरील तीन दुर्गुण आत्मसात केले, तर त्याचे सुद्धा हे तीन ग्रह वाईट फळ द्यायला सुरुवात करतील.
उपाय - गुळाची पोळी बनवून, त्यावर मोहरीचा तेलाचा सात रेघा डाव्या हाताचा मधल्या बोटानी बनवून, मग ती पोळी कोणत्याही कुत्र्याला खाऊ घालणे. असे किमान ४३ दिवस करणे. असे केल्यानी वरील दोष जलद कमी होण्यास मदत होईल
अविघ्नमस्तु !
शंतनू जोशी
ज्योतिष शास्त्र , वास्तू शास्त्र आणि अंकशास्त्र सल्लागार
पुणे

Tuesday, September 3, 2019

घोड्याची नाल - अकस्मात धनलाभ का विनाकारण त्रास ? ***शंतनू जोशी***


आपल्या सर्वांनी अनेक घरांचा बाहेर , दुकानाचा बाहेर घोड्याची नाल लावलेली पाहिली असेल. पण ह्या बद्दल संपूर्ण माहिती लोकांना नसते. अनेक लोक कुठून तरी वाचून हा उपाय करत असतात. हा उपाय करणार्यां मध्ये काही लोकांना अकस्मात आणि भरमसाट फायदा झालेला दिसतो, तर काही लोकांना भयंकर नुकसान होताना दिसते. म्हणून काही गोष्टी पुढील प्रमाणे समजून मगच ह्याचा प्रयोग करावा , अन्यथा हा उपाय फार नुकसान कारक ठरू शकतो.

***शंतनू जोशी***
१) घोड्याची नाल शनी ग्रहाचे प्रतीक मानली जाते.
२) ज्या लोकांना शनी कुंडलीत अनुकूल आहे अश्याच लोकांना घोड्याची नाल लाभते , अन्यथा नुकसान देते.
३) घोड्याची नाल फक्त शनीचा अमला खाली येणाऱ्या व्यवसायांसाठीच लाभदायक ठरते, किंवा त्या निगडित नोकरी करणाऱ्यांसाठीच लाभते.
४) घोड्याची नाल हि वास्तविक घोड्यांची वापरलेली नाल असावी लागते. कोणतीही लोखंडाची नाल लावून फायदा होत नसतो.
५) शनी ग्रह आपल्या पत्रिके मध्ये कोणत्या राशीत आणि नक्षत्रात आहे, त्या वरून ठरते कि नाल सिद्ध करण्याची पद्धत कोणती.
६) फॅब्रिकेशन , सट्टा-लॉटरी , चामड्याशी संबंधित व्यवसाय हे शनीशी संबंधित असतात. अजूनही अनेक व्यवसाय शनीचा अमला खाली येतात.
७) घोड्याची वापरलेली नाल मिळवून त्या धातू पासून अंगठी बनवून घातल्यास सुद्धा फायदा होऊ शकतो.

***शंतनू जोशी***
वरील कोणताही मुद्दा चुकल्यास अत्त्यंत खराब परिणाम मिळतात. माझ्या पाहण्यात असे लोक आहेत ज्यांचे चांगले चालणारे व्यवसाय घोड्याची नाल चुकीचा पद्धतीने वापर केल्या मुळे बंद झाले. माझ्या ओळखीतले एक बिल्डर घोड्याची नाल लावल्या नंतर कोर्ट कचेर्यान मध्ये अडकले. त्या मुळे मित्रांनो घोड्याची नाल लावण्याची घाई करू नये. कोणाचे तरी मार्गदर्शन घेऊन मगच ह्या उपायाचा वापर करावा.
चांगले अनुभव - बरोबर पध्दतीनी वापरलेली नाल वापरल्या मुळे एका मुलाला लॉटरी मधून लाभ झाला. योग्य पद्धतींनी सिद्ध केलेली घोड्याची नाल वापरून ,एक सज्जन अनेक वर्ष डुबता असलेला फॅब्रिकेशन चा व्यवसाय चांगल्या पद्धतींनी चालवून पुढील दीड वर्षात कर्ज मुक्त झाले.
***शंतनू जोशी***
ज्योतिष शास्त्र , वास्तू शास्त्र आणि अंक शास्त्र सल्लागार
पुणे


फक्त व्हाट्स अँप - ९५५२५९३९५१

दैनंदिन समस्या निवारण # ८ - शिक्षणात , संपत्तीत आणि विवाहात सतत अडचणी , भांडणं आणि आर्थिक दिवाळे ! - शंतनू जोशी


मनुष्याचा पत्रिकेत एक बुध ग्रह खराब झाला कि माणसाचे आयुष्य हे अत्त्यंत खराब होते. बुध हा बुद्धीचा कारक ग्रह आहे , त्या मुळे बुध बिघडला कि माणसाची बुद्धी भ्रष्ट होते. माणूस एकापुढे एक चूकीचे निर्णय घेत जातो , खोटे बोलतो , फ्रॉड करतो आणि स्वतःच जाऊन कायद्याचा कचाट्यात सापडतो. अश्या माणसाचे डोके शांत राहू शकत नाही , सतत शंका कुशंका मनामध्ये भुणभुणत असतात.
***शंतनू जोशी ***
स्वतःचा बायको आणि नवऱ्यावर सुद्धा संशय. स्वतःचे चारित्र्य कधीच विकून झालेले असते पण, दुसऱ्याला मात्र उपदेशामृताचे डोस देण्यास हे लोक विसरत नाहीत. सतत ज्यात त्यात चुका शोधणे , स्वतः व्यसनाचा आहारी जाणे. एक प्रकारचा भ्रमिष्टपणा ह्या लोकां मध्ये दिसून येतो. विचित्र स्वप्न सतत पडणे , सारखे आजारी पडणे , विनाकारण चीड चीड आणि तिरसटपणा करणे ही सर्व ह्या लोकांची लक्षण आहेत . असे लोक चार चौघात राजकारण आणि धर्मावर सतत काहीतरी फिलॉसॉफी झोडत असतात. स्वतःचा आयुष्याचे वाजलेले बारा मात्र ह्यांना काही केल्या निस्तरत नाहीत.
***शंतनू जोशी ***
ह्या लोकांना शिक्षण असो अथवा व्यवसाय काही केल्या जमत नाही. घरात वाद आणि बऱ्याचदा मारा मारी पर्यंत गेलेले वाद हे ह्यांचा कडे सामान्य असतात. सतत कर्ज दिवाळखोरी हि ह्यांची नेहेमीची दिनचर्याच बनते. बरं नोकरी करावी तर तिथे सुद्धा वाद , भांडण आणि राजकारण ह्यांना स्वस्थ बसू देत नाहीत. बुध ग्रह खराब का चांगला हे नेमकेपणानी तर चांगला ज्योतिषीच सांगू शकतो. पण आपला बुध ग्रह जर मीन किंवा धनु राशीत असेल, किंवा ६,८,१२ घरांमध्ये असेल तर आपल्याला वरील लक्षणं दिसण्याची शक्यता सगळ्यात जास्ती असते.
***शंतनू जोशी ***
उपाय -
१) खोटे बोलू नये
२) दारू , सिगरेट ,बिडी ,तंबाखू-गुटखा व्यसने सोडून द्यावीत
३) फक्त कामापुरतेच बोलावे. वायफळ बडबड आणि खर्च टाळावे.
४) भीमरूपी स्तोत्राचे १२०० पाठ दर वर्षी एकदा तरी करावेत. ६० दिवस रोज २० वेळा म्हणल्यास हे सहज शक्य आहे.
५) अमेथिस्ट क्रिस्टल ची अंगठी हातात जरूर घालावी

***शंतनू जोशी ***
ज्योतिषशास्त्र , अंकशास्त्र आणि वास्तुशास्त्र सल्लागार
पुणे

९५५२५९३९५१ - फक्त व्हॉट्स ऍप

दैनंदिन समस्या निवारण # ७ - दुकान चालत नाही - शंतनू जोशी


अनेक लोक हातातल्या नोकऱ्या सोडून व्यवसाय सुरु करतात. अनेक जण आजकाल शिक्षण सुद्धा अर्धवट करून घाई घाई मध्ये व्यवसाय उघडतात. अनेक गृहिणी काहीतरी करायच असे म्हणून एखादा घरगुती किंवा दुकान घेऊन व्यवसाय सुरु करतात. आणि कोणताही व्यवसाय सेट व्हायला वेळ हा लागतच असतो. पण अनेक लोक कमी कामात जास्ती पैसे मिळवण्यासाठीच व्यवसायात येतात.

अनेक जण ह्याच लालसेमुळे अनेक चुकीचे निर्णय घेतात. अनेक जण पटकन व्यवसाय उघडतात , कर्ज घेतात आणि जरा परिस्थिती अवघड झाली कि पळ काढतात. काही लोकांची ह्याचा विरुद्ध अवस्था असते. हे लोक कितीही अपयश आले , कर्ज झाली आणि भांडण झाली तरी व्यवसाय सोडत नाहीत. अनेक जण चुकीची partnership करून स्वतः मोट्ठ्या खड्ड्यात उडी मारतात ! मल्टीलेव्हल मार्केटींग स्कीम्स म्हणजे 'तुमचा' व्यवसाय न्हवे ! हा एक प्रकारे दलालीचा व्यवसाय असतो आणि बऱ्याचदा हा फसवाच असतो. पण अनेक भाबडी / मूर्ख ?! लोक ह्या जाळ्यात अडकतात आणि मग अनेक वर्ष कर्जबाजारी होतात.

***शंतनू जोशी ***

१) कधीही कोणताही व्यवसाय सुरु करताना एखाद्या चांगल्या ज्योतिषाला (नामवंत असेलच असे नाही) विचारावे कि मला व्यवसाय suitable आहे का नोकरी ? दुसरी गोष्ट म्हणजे ज्या क्षेत्राशी निगडित व्यवसाय करायचा आहे तो सूट होतो का ? भागीदारी करण्यासाठी जो भागीदार बरोबर आहे का ? भागीदारी योग्य आहे का नाही ? हे सर्व विचारूनच पुढे जावे म्हणजे पुढचे अनेक खड्डे चुकवता येतात.

२) दुकानाची वास्तू चेक केल्याशिवाय दुकान घेऊ नये !

३) मोट्ठे लोन घेताना ज्योतिषीय सल्ला घेणे चांगले .

३) दुकानात ईशान्य दिशेला चांदीचा वाटीत गुलाबजल मिश्रित पाणी ठेवून त्यात दक्षिणावर्ती शंख बुडवून ठेवावा.

४) दुकानाचा देव्हाऱ्यात कुबेर , लक्ष्मी , गणेश आणि बालाजी हे फोटो अवश्य ठेवावेत.

५) दुकानाचा गल्ल्यात कार्नेलियन क्रिस्टल चे ५ क्रिस्टल्स ठेवावेत !

६) दैनंदिन समस्या निवारण # २ आणि ५ मध्ये दिलेले उपाय करणे.

७) कोणतेही नवीन निर्णय घेताना शक्यतो नवरा /बायको आणि कामा निगडित व्यक्तींना सोडून कोणालाही त्या बद्दल सांगू नये.

८) आपण करीत असलेले उपासना , उपाय , व्रत वैकल्य इत्यादी लोकान समोर बोलू नयेत.

अविघ्नमस्तु !

शंतनू जोशी
ज्योतिषशास्त्र , अंकशास्त्र आणि वास्तुशास्त्र सल्लागार

पुणे

Friday, July 26, 2019

ज्योतिष आणि निसर्ग - शंतनू जोशी


ज्योतिषीय उपाय सगळेच काहीनाकाही करत असतात. पण हे करत असताना आपण निसर्गा साठी काही करूशकलो तर सोने पे सुहागा ठरेल. कारण निसर्ग हाच भारतीय धर्म आणि तंत्रशास्त्राचा आधार आहे. प्राकृतिक शक्तींचा सन्मान आणि त्यांच संवर्धन करणे हे अत्त्यंत आवश्यक आहे. प्रकृती नाही तर आपण नाही ! आपली प्रत्येक कृती हि आपल्यावर आणि निसर्गावर काही ना काही परिणाम नक्कीच करत असते.
१) स्वच्छता - आपल्या घरातील स्च्छता हि फार महत्वाची आहे. जुन्या तुटक्या फुटक्या वस्तू , गंजलेल्या लोखंडी वस्तू , बंद पडलेल्या वस्तू आणि धूळ घाण साठणे. ह्या सगळ्या मुळे शनी , राहू , केतू , मंगळ , नेपचून, युरेनस हे सर्व ग्रह खराब परिणाम द्यायला सुरुवात करतात. त्या मुळे आपले घर , कार्यालय , दुकान , सोसायटी सगळे अत्त्यंत स्वच्छ ठेवा. ह्या शिवाय बाहेर सुद्धा कुठेही घाण आणि कचरा पसरवू नका. नेहेमी सर्वत्र स्वचछता ठेवा म्हणजे सर्व ग्रह आधी पेक्षा चांगले परिणाम देतील.
२) पाणी वाया घालवणे - घरातील लीक होणारे नळ , भिंतींवर आलेली ओल आणि आपल्या टेरेस किंवा अंगणातील पाण्याची डबकी किंवा साठेलेलं घाणेरडे पाणी हे सर्व आपला चंद्र खराब करतात. ह्या मुळे आपल्याला शारीरिक , मानसिक, आर्थिक आणि कौटुंबिक त्रास वाढतात. आपल्या घरात , कार्यालयात आणि दुकानात कुठेही पाणी वाया घालवू नका. लिकेज सर्वत्र रिपेयर करून घ्या , भिंतीवरची ओल काढून टाका. आणि बाहेर जाल तेंव्हा सुद्धा नदी , तळी , समुद्र सर्व घाण करू नका . भारतीय संस्कृतीत आपण नदीला, समुद्राला, जलाशयाला पुजतो, पण अनेकदा लोक ह्याच नदीत कितीतरी कचरा टाकतात. समुद्रात दारूचा बाटल्या टाकतात. असे केल्याने निश्चितच हि घाण पस्रवणाऱ्यांना त्रास होणार. कोणत्याही प्रकारचे अजैविक म्हणजे नॉन बायोडिग्रेडेबल सामान , रसायन किंवा कचरा नदीत /समुद्रात / जलाशयात / विहरीत टाकू नये.
***शंतनू जोशी***
३) पक्षी पालन - बरेच लोकांना हौस असल्या मुळे पक्षी पिंजऱ्यात ठेवून घरात पाळतात. अश्या प्रकारे पक्ष्यांना कोंडून ठेवल्याने आपल्या पत्रिकेतील बुद्ध ग्रह खराब होतो आणि आपल्याला मोट्ठ्या प्रमाणात व्यापारात आर्थिक नुकसान होऊ शकते तसेच आपले व्यावसायिक संबंध खराब होऊ शकतात. त्या मुळे पिंजऱ्यातील पक्षी आपल्या वाढदिवस दिवशी विकत घेऊन नंतर काही काळानी ते पक्षी मोकळे सोडून द्यावेत. हे पक्षी अचानक मोकळे सोडल्यास मरू शकतात, त्या मुळे काही काळ त्यांना सवय होई पर्यंत ते पक्षी ठेवावेत आणि नंतर पक्ष्यांना बाहेर मुक्त राहण्याची सवय झाल्यावर कायमचे सोडून द्यावे.
४) मासे पाळणे - पक्ष्यां प्रमाणेच माश्यांना बंदिस्त ठेवणे हे आपल्या पत्रिकेतील शनी ग्रहाला क्षीण करत असते. ह्या पेक्षा aquarium मधील माश्यांना मुक्त करणे हे जास्ती पुण्याचे काम आहे.
५) गाय , कुत्री , कावळे ह्यांना गुळ पोळी , बिस्कीट इत्यादी खाऊ घालणे हे शत्रू पीडा , आरोग्य पीडा , कोर्ट कचेरी ची पीडा आणि कर्ज पीडा दूर करण्यास मदत करते.
६) मेष -सिंह -धनु ह्या राशीचा लोकांनी जमेल तितके बिल्व वृक्ष आणि औदुंबर वृक्ष लावल्यास असीम फायदे होऊ शकतात.
वृषभ - कन्या - मकर ह्या राशीचा लोकांनी वटवृक्ष , पिंपळ ह्याचे वृक्ष लावल्यास त्यांना लाभ होतो.
मिथुन - तूळ - कुंभ ह्या राशीचा लोकांनी तुळस आणि झेंडू ची जमेल तितकी झाड लावल्यास त्यांना लाभ होतो.
कर्क - वृश्चिक - मीन ह्या राशीचा लोकांनी आम्रवृक्ष , फणस वृक्ष इत्यादी लावल्यास त्यांना लाभ होतो .
ह्यात पुढे अजून भाग जोडण्याची ईच्छा आहे. ज्यात नक्षत्रानुसार वृक्षांची माहिती असेल आणि त्या नुसार कोणी कोणते झाड लावावे इत्यादी.
क्रमशः
ज्योतिषशास्त्र , वास्तूशास्त्र आणि अंकशास्त्र सल्लागार
9552593951 only what's app
शंतनू जोशी
पुणे

Monday, July 22, 2019

'अध्यात्म - गुरु - अनुभूती' - सत्य असत्य - शंतनू जोशी

सध्या सोशल मीडियाचा माध्यमातून अनेक विषय लोक उघड करून फेसबुक वर टाकतात. त्यामुळे सगळेच विषय मोकळ्यावर सगळ्यान समक्ष येतात. इतर विषयान प्रमाणे अध्यात्मिक विषयांवर सुद्धा खूप लिहिले बोलले जाते . हे सोशल मीडिया वर टाकावे का नाही हा वेगळा मुद्दा आहे. पण त्यातून काही विषय समजुती ह्या कशा चुकीचा झाल्या आहेत, भरकटल्या आहेत आणि त्या मुळे किती मानसिक , आत्मिक नुकसान माणूस करून घेतो हे हि दिसते .
तर अश्या अनेक विषयान पैकी एक म्हणजे संत आणि संतानुभव, आणि त्या मधून लोकांना आलेल्या अनुभूती इत्यादी. सध्या बहुत करून लोक देव सोडून गुरुं वर जास्ती भर देतात. आणि त्या गुरु भक्तीत ते आकंठ बुडालेले असतात. सर्व काही विसरून गुरु भक्ती आणि गुरु मय झालेले असतात .
तर गुरु भक्ती किंवा संत भक्ती ह्यावर माझा शून्य आक्षेप आहे . ज्याची त्याची श्रद्धा .
पण त्याच वेळी काही मुद्द्यांवर वैचारिक clarity फार महत्वाची असते आणि खूप मोट्ठ्या प्रमाणात हरवलेली दिसते म्हणून पुढील काही मुद्दे मांडतो. ह्यात काही चुकीचे समज आणि त्या मागील लोकांची कारण मीमांसा ह्या बद्दल मी बोलणार आहे.
गैर समज
नम्बर १) संतान शिवाय किंवा गुरूंशिवाय आपल्याला अध्यात्मिक प्रगती, अनुभव आणि मोक्ष मिळू शकत नाही.
उत्तर - ८४ लक्ष योनी फिरून मग एकदा मनुष्य जन्म मिळतो असे म्हणतात आणि मनुष्य जन्म हा एकमेव असा जन्म आहे ज्याच्यात मनुष्य अध्यात्मिक प्रगती करून घेऊ शकतो आणि नराचा नारायण बनवू शकतो ! विचार करा !!! नराचा नारायण होऊ शकतो ! म्हणजे एवढी क्षमता आहे ह्या मनुष्य जन्मात. त्या मुळे कोणीतरी तुम्हाला मार्गदर्शन केले नाही ,किंवा कोणी गुरु नसतील, तर तुम्हाला ते अनुभव/ ती प्रगती प्राप्तच होऊ शकत नाही, हे १००% अशक्य आहे. मुळात मनुष्य अहं ब्रह्मास्मि आणि तत् त्वं असी चा अनुभव घ्यायला आला आहे आणि जो परमेश्वर तुमच्या आत आहे त्याला तुम्ही स्वतः experience करू शकत नाही ?! हे शक्यच नाही.
उलट पक्षी तुमचा शिवाय दुसरा कोणीही माईचा लाल तुम्हाला ते अनुभव देऊ शकत नाही. तसेच तुम्हाला तुमचा इच्छे विरुद्ध वंचित सुद्धा ठेवू शकत नाही . दर्शन आणि स्वप्न इत्यादी अनुभूती ह्या संकेत असू शकतात. पण त्या गोष्टी परम अनुभव नव्हेत. परम अनुभव तुम्हाला फक्त एकाच माणूस देऊ शकतो. तुम्ही स्वतः.
२) गुरुं मध्ये आणि देवा मध्ये फरक नसतो. ते एकच असतात.
उत्तर - हेच तर सगळ्यात मोट्ठे असत्य आहे. गुरुं मध्ये परमेश्वर आहे निश्चित पण तो तेवढाच जेवढा समस्त मनुष्य , प्राणी आणि वृक्ष मात्रात आहे. संतान मध्ये आपल्या पेक्षा जरा जास्तीच देव भरलाय असे होऊ शकत नाही. आणि ते एकच असते तर संतांनी देवाची भक्ती , ध्यान, साधना केले नसते आणि त्या निगडित स्तोत्र, मंत्र आणि तंत्र अभ्यासले आणि रचले नसते. संतांनी स्वतः भगवत भक्तीच जास्ती केलेली आहे. मुळात गुरु म्हणजे तुमचा अंधकार मिटवणार माध्यम आहे. पण म्हणजे माध्यम हेच साध्य होत नाही. साध्य केवळ परमेश्वर. गुरुं मध्ये प्रकट होणारी दैवी शक्ती हि तुम्हाला ते गुरु / संत म्हणजेच देव आहेत असे दाखवण्या साठी नसून . हि महाशक्ती तुमच्यात सुद्धा आहे आणि जसे त्यांनी सामान्य मनुष्य असून सुद्धा ती शक्ती जागृत केली , उत्क्रांत केली तशीच ती तुम्हीही करू शकता हे दाखवून देण्या साठी आहे. ते समजायचे सोडून त्याच माणसाचे पाय धरून तोच देव आहे असे म्हणणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी असे आहे . मग त्यांनी दिलेल्या अनुभूती, शिकवण वाया गेले असा अर्थ होतो . त्या मुळे गुरूंचा आदर करावा पण परमेश्वर पहिले हे लक्षात ठेवावे.
३) आपलं एवढ नशीब नाही कि देव आपल्याला दिसेल किंवा बोलेल.
उत्तर - संतांना दिसू शकतो , त्यांच्याशी बोलू शकतो तर तो तुमच्याशी सुद्धा बोलू शकतो. जो देव तुमचा आत आहे तुमचाशी बोलू शकत नाही ?! हे अशक्य आहे. आणि मुळात देव दिसणे आणि देव बोलणे ह्या संकल्पनांचा पलीकडे गेले पाहिजे. देव हि शक्ती आहे माणूस नाही. त्याम उले देवाचा अनुभव येऊ शकतो. तो दिसेलच किंवा बोललच असे नाही. आणि दिसण्या बोलण्याची गरज आहे असे हि नाही. जो अनुभव देव देऊ शकतो तो कोणीच देऊ शकत नाही. आणि देव कोणती गोष्ट करू शकत नाही असे हि असू शकत नाही. पंगुम लंघयते गिरीम , मुकं वाचालं करोति ! पांगळ्याला चालवणारा आणि आंधळ्यांना दृष्टी देऊ शकणार , मुक्याला वाचस्पती बनवणारा परमेश्वर काहीही करू शकतो. तुम कितने यकीन और शिद्दत से कोशिश करते हो इस्पे बात बनती या बिगडती है. आणि हो संत आणि गुरु कितीही मिळाले तरी शेवटी स्वतः परमेश्वरा कडे मोर्चा वळवून स्वतःच तो परमानुभव साध्य करावाच लागतो. संत आणि गुरु तुमचा साठी शॉर्ट कट किंवा बाय पास काढू शकत नाही. ते तुम्हाला योग्य मार्ग दाखवू शकतात , चांगल्या गोष्टी शिकवू शकतात इतकेच.
४) आपल्याला मिळू शकतो देव पण ते अवघड असते आणि गुरुं मुळे ते सोप्पे होते.
उत्तर - असे काहीही होत नाही. असे असते तर सगळ्या संतांनी आणि गुरूंनी त्यांचा शिष्यांना तपश्चर्या, उपासना, साधना , ध्यान आणि सेवा करायला लावल्या नसत्या. थोड्यक्यात काय तर ये प्यास बुझाने के लिये खुद हि कुआ खोदना पडेगा ! गुरु तो सिर्फ खोदने जगह बता सकते हैं. औजार तो तुम खुद हो, लग जाओ काम पे.
क्रमशः
- शंतनू जोशी

ज्योतिष मर्म # १९ - विमशोत्तरी दशा आणि फळ. - शंतनू जोशी



ज्या लोकांना ज्योतिष विषयक माहिती नाही अश्यांना 'महादशा' म्हणले कि धस्स होतं !   त्यांना साडे साती प्रमाणे महादशा म्हणजे काहीतरी मोट्ठे संकट असे वाटते . मुळात साडे साती सुद्धा सगळ्यांसाठी संकट ठरत नाही तसेच महादशा सुद्धा ठरत नाही.  मुळात साडे साती हि फक्त आपल्या चंद्र राशी चा आधारे असते आणि शनीचा ट्रान्सीट/गोचर भ्रमणा नुसार असते.   पण महादशा हि त्याहून खूप सशक्त आणि मूलभूत संकल्पना आहे.

विमशोत्तरी दशा म्हणजे महादशा , अंतर दशा आणि प्रत्यंतर दशा, त्याचा पुढे सूक्ष्म दशा आणि प्राण दशा.   आपल्या जन्माचा वेळी चंद्र ज्या नक्षत्रात होता त्या नक्षत्र स्वामीची महादशा तुम्हाला जन्माचा वेळी होती.  आणि मग आपण जसे मोट्ठे व्हाल तसे विशिष्ट सिक्वेन्स मधे एका मागे एक सर्व ग्रहांचा दशा आपल्याला लागू होत जातात.  ज्योतिष शास्त्रामधे आपल्या आयुष्याचे भविष्य कथन करायचे असेल तर आधी तुमचा आयुष्याचा काळ विभागता आला पाहिजे. विभाग केल्या शिवाय आपण एखादी घटना नेमकी कधी घडेल हे सांगू शकणार नाही.  त्या मुळे विमशोत्तरी दशा पद्धती हि ज्योतिषाचा पाया मानली पाहिजे.  विशिष्ट ज्योतिषीय गणितानुसार हे प्रत्येक ग्रहासाठी निश्चित केलेले वेग वेगळे (unequal) कालखंड हेच खरे तर फलज्योतिषचा पाया आहेत. 

तर मुळात विमशोत्तरी म्हणजे १२० वर्षांचा काल खंड.  मग त्या काल खंडाचे प्रत्येक ग्रहाचा गणितानुसार ९ विभाग केले जातात,  त्यांना महादशा असे म्हणले जाते.  ह्या महादशेत पुन्हा ९ विभाग केले जातात त्यांना अंतर दशा म्हणतात.  आणि अंतर्दशेचे पुन्हा ९ विभाग केले जातात ज्यांना प्रत्यंतर दशा म्हणले जाते.  आणि मग तशाच प्रमाणे पुढे सूक्ष्म आणि प्राण दशा सुद्धा असतात.  मग तदनुसार तुम्हाला त्या त्या कालखंडात त्या त्या ग्रहांचे परिणाम मिळणार. ग्रहांचे फळ हा एक स्वतंत्र विषय आहे त्यावर पुन्हा केव्हा तरी.

काळजी नसावी
शंतनू जोशी