Friday, July 26, 2019

ज्योतिष आणि निसर्ग - शंतनू जोशी


ज्योतिषीय उपाय सगळेच काहीनाकाही करत असतात. पण हे करत असताना आपण निसर्गा साठी काही करूशकलो तर सोने पे सुहागा ठरेल. कारण निसर्ग हाच भारतीय धर्म आणि तंत्रशास्त्राचा आधार आहे. प्राकृतिक शक्तींचा सन्मान आणि त्यांच संवर्धन करणे हे अत्त्यंत आवश्यक आहे. प्रकृती नाही तर आपण नाही ! आपली प्रत्येक कृती हि आपल्यावर आणि निसर्गावर काही ना काही परिणाम नक्कीच करत असते.
१) स्वच्छता - आपल्या घरातील स्च्छता हि फार महत्वाची आहे. जुन्या तुटक्या फुटक्या वस्तू , गंजलेल्या लोखंडी वस्तू , बंद पडलेल्या वस्तू आणि धूळ घाण साठणे. ह्या सगळ्या मुळे शनी , राहू , केतू , मंगळ , नेपचून, युरेनस हे सर्व ग्रह खराब परिणाम द्यायला सुरुवात करतात. त्या मुळे आपले घर , कार्यालय , दुकान , सोसायटी सगळे अत्त्यंत स्वच्छ ठेवा. ह्या शिवाय बाहेर सुद्धा कुठेही घाण आणि कचरा पसरवू नका. नेहेमी सर्वत्र स्वचछता ठेवा म्हणजे सर्व ग्रह आधी पेक्षा चांगले परिणाम देतील.
२) पाणी वाया घालवणे - घरातील लीक होणारे नळ , भिंतींवर आलेली ओल आणि आपल्या टेरेस किंवा अंगणातील पाण्याची डबकी किंवा साठेलेलं घाणेरडे पाणी हे सर्व आपला चंद्र खराब करतात. ह्या मुळे आपल्याला शारीरिक , मानसिक, आर्थिक आणि कौटुंबिक त्रास वाढतात. आपल्या घरात , कार्यालयात आणि दुकानात कुठेही पाणी वाया घालवू नका. लिकेज सर्वत्र रिपेयर करून घ्या , भिंतीवरची ओल काढून टाका. आणि बाहेर जाल तेंव्हा सुद्धा नदी , तळी , समुद्र सर्व घाण करू नका . भारतीय संस्कृतीत आपण नदीला, समुद्राला, जलाशयाला पुजतो, पण अनेकदा लोक ह्याच नदीत कितीतरी कचरा टाकतात. समुद्रात दारूचा बाटल्या टाकतात. असे केल्याने निश्चितच हि घाण पस्रवणाऱ्यांना त्रास होणार. कोणत्याही प्रकारचे अजैविक म्हणजे नॉन बायोडिग्रेडेबल सामान , रसायन किंवा कचरा नदीत /समुद्रात / जलाशयात / विहरीत टाकू नये.
***शंतनू जोशी***
३) पक्षी पालन - बरेच लोकांना हौस असल्या मुळे पक्षी पिंजऱ्यात ठेवून घरात पाळतात. अश्या प्रकारे पक्ष्यांना कोंडून ठेवल्याने आपल्या पत्रिकेतील बुद्ध ग्रह खराब होतो आणि आपल्याला मोट्ठ्या प्रमाणात व्यापारात आर्थिक नुकसान होऊ शकते तसेच आपले व्यावसायिक संबंध खराब होऊ शकतात. त्या मुळे पिंजऱ्यातील पक्षी आपल्या वाढदिवस दिवशी विकत घेऊन नंतर काही काळानी ते पक्षी मोकळे सोडून द्यावेत. हे पक्षी अचानक मोकळे सोडल्यास मरू शकतात, त्या मुळे काही काळ त्यांना सवय होई पर्यंत ते पक्षी ठेवावेत आणि नंतर पक्ष्यांना बाहेर मुक्त राहण्याची सवय झाल्यावर कायमचे सोडून द्यावे.
४) मासे पाळणे - पक्ष्यां प्रमाणेच माश्यांना बंदिस्त ठेवणे हे आपल्या पत्रिकेतील शनी ग्रहाला क्षीण करत असते. ह्या पेक्षा aquarium मधील माश्यांना मुक्त करणे हे जास्ती पुण्याचे काम आहे.
५) गाय , कुत्री , कावळे ह्यांना गुळ पोळी , बिस्कीट इत्यादी खाऊ घालणे हे शत्रू पीडा , आरोग्य पीडा , कोर्ट कचेरी ची पीडा आणि कर्ज पीडा दूर करण्यास मदत करते.
६) मेष -सिंह -धनु ह्या राशीचा लोकांनी जमेल तितके बिल्व वृक्ष आणि औदुंबर वृक्ष लावल्यास असीम फायदे होऊ शकतात.
वृषभ - कन्या - मकर ह्या राशीचा लोकांनी वटवृक्ष , पिंपळ ह्याचे वृक्ष लावल्यास त्यांना लाभ होतो.
मिथुन - तूळ - कुंभ ह्या राशीचा लोकांनी तुळस आणि झेंडू ची जमेल तितकी झाड लावल्यास त्यांना लाभ होतो.
कर्क - वृश्चिक - मीन ह्या राशीचा लोकांनी आम्रवृक्ष , फणस वृक्ष इत्यादी लावल्यास त्यांना लाभ होतो .
ह्यात पुढे अजून भाग जोडण्याची ईच्छा आहे. ज्यात नक्षत्रानुसार वृक्षांची माहिती असेल आणि त्या नुसार कोणी कोणते झाड लावावे इत्यादी.
क्रमशः
ज्योतिषशास्त्र , वास्तूशास्त्र आणि अंकशास्त्र सल्लागार
9552593951 only what's app
शंतनू जोशी
पुणे

No comments:

Post a Comment