Wednesday, September 18, 2019

गुरु मंत्र - शंतनू जोशी

भित्र्या, आळशी आणि फुकट्या माणसाला आयुष्यात कधीच, कुठल्याच बाबतीत यश मिळू शकत नाही. भित्र्याचा मंगल खराब , आळशी माणसाचा शनी खराब आणि फुकट्या माणसाचा केतू खराब. ज्या माणसाचे पत्रिकेत हे तीन ग्रह शुभ आहेत अश्यानी सुद्धा, जर वरील तीन दुर्गुण आत्मसात केले, तर त्याचे सुद्धा हे तीन ग्रह वाईट फळ द्यायला सुरुवात करतील.
उपाय - गुळाची पोळी बनवून, त्यावर मोहरीचा तेलाचा सात रेघा डाव्या हाताचा मधल्या बोटानी बनवून, मग ती पोळी कोणत्याही कुत्र्याला खाऊ घालणे. असे किमान ४३ दिवस करणे. असे केल्यानी वरील दोष जलद कमी होण्यास मदत होईल
अविघ्नमस्तु !
शंतनू जोशी
ज्योतिष शास्त्र , वास्तू शास्त्र आणि अंकशास्त्र सल्लागार
पुणे

Tuesday, September 3, 2019

घोड्याची नाल - अकस्मात धनलाभ का विनाकारण त्रास ? ***शंतनू जोशी***


आपल्या सर्वांनी अनेक घरांचा बाहेर , दुकानाचा बाहेर घोड्याची नाल लावलेली पाहिली असेल. पण ह्या बद्दल संपूर्ण माहिती लोकांना नसते. अनेक लोक कुठून तरी वाचून हा उपाय करत असतात. हा उपाय करणार्यां मध्ये काही लोकांना अकस्मात आणि भरमसाट फायदा झालेला दिसतो, तर काही लोकांना भयंकर नुकसान होताना दिसते. म्हणून काही गोष्टी पुढील प्रमाणे समजून मगच ह्याचा प्रयोग करावा , अन्यथा हा उपाय फार नुकसान कारक ठरू शकतो.

***शंतनू जोशी***
१) घोड्याची नाल शनी ग्रहाचे प्रतीक मानली जाते.
२) ज्या लोकांना शनी कुंडलीत अनुकूल आहे अश्याच लोकांना घोड्याची नाल लाभते , अन्यथा नुकसान देते.
३) घोड्याची नाल फक्त शनीचा अमला खाली येणाऱ्या व्यवसायांसाठीच लाभदायक ठरते, किंवा त्या निगडित नोकरी करणाऱ्यांसाठीच लाभते.
४) घोड्याची नाल हि वास्तविक घोड्यांची वापरलेली नाल असावी लागते. कोणतीही लोखंडाची नाल लावून फायदा होत नसतो.
५) शनी ग्रह आपल्या पत्रिके मध्ये कोणत्या राशीत आणि नक्षत्रात आहे, त्या वरून ठरते कि नाल सिद्ध करण्याची पद्धत कोणती.
६) फॅब्रिकेशन , सट्टा-लॉटरी , चामड्याशी संबंधित व्यवसाय हे शनीशी संबंधित असतात. अजूनही अनेक व्यवसाय शनीचा अमला खाली येतात.
७) घोड्याची वापरलेली नाल मिळवून त्या धातू पासून अंगठी बनवून घातल्यास सुद्धा फायदा होऊ शकतो.

***शंतनू जोशी***
वरील कोणताही मुद्दा चुकल्यास अत्त्यंत खराब परिणाम मिळतात. माझ्या पाहण्यात असे लोक आहेत ज्यांचे चांगले चालणारे व्यवसाय घोड्याची नाल चुकीचा पद्धतीने वापर केल्या मुळे बंद झाले. माझ्या ओळखीतले एक बिल्डर घोड्याची नाल लावल्या नंतर कोर्ट कचेर्यान मध्ये अडकले. त्या मुळे मित्रांनो घोड्याची नाल लावण्याची घाई करू नये. कोणाचे तरी मार्गदर्शन घेऊन मगच ह्या उपायाचा वापर करावा.
चांगले अनुभव - बरोबर पध्दतीनी वापरलेली नाल वापरल्या मुळे एका मुलाला लॉटरी मधून लाभ झाला. योग्य पद्धतींनी सिद्ध केलेली घोड्याची नाल वापरून ,एक सज्जन अनेक वर्ष डुबता असलेला फॅब्रिकेशन चा व्यवसाय चांगल्या पद्धतींनी चालवून पुढील दीड वर्षात कर्ज मुक्त झाले.
***शंतनू जोशी***
ज्योतिष शास्त्र , वास्तू शास्त्र आणि अंक शास्त्र सल्लागार
पुणे


फक्त व्हाट्स अँप - ९५५२५९३९५१

दैनंदिन समस्या निवारण # ८ - शिक्षणात , संपत्तीत आणि विवाहात सतत अडचणी , भांडणं आणि आर्थिक दिवाळे ! - शंतनू जोशी


मनुष्याचा पत्रिकेत एक बुध ग्रह खराब झाला कि माणसाचे आयुष्य हे अत्त्यंत खराब होते. बुध हा बुद्धीचा कारक ग्रह आहे , त्या मुळे बुध बिघडला कि माणसाची बुद्धी भ्रष्ट होते. माणूस एकापुढे एक चूकीचे निर्णय घेत जातो , खोटे बोलतो , फ्रॉड करतो आणि स्वतःच जाऊन कायद्याचा कचाट्यात सापडतो. अश्या माणसाचे डोके शांत राहू शकत नाही , सतत शंका कुशंका मनामध्ये भुणभुणत असतात.
***शंतनू जोशी ***
स्वतःचा बायको आणि नवऱ्यावर सुद्धा संशय. स्वतःचे चारित्र्य कधीच विकून झालेले असते पण, दुसऱ्याला मात्र उपदेशामृताचे डोस देण्यास हे लोक विसरत नाहीत. सतत ज्यात त्यात चुका शोधणे , स्वतः व्यसनाचा आहारी जाणे. एक प्रकारचा भ्रमिष्टपणा ह्या लोकां मध्ये दिसून येतो. विचित्र स्वप्न सतत पडणे , सारखे आजारी पडणे , विनाकारण चीड चीड आणि तिरसटपणा करणे ही सर्व ह्या लोकांची लक्षण आहेत . असे लोक चार चौघात राजकारण आणि धर्मावर सतत काहीतरी फिलॉसॉफी झोडत असतात. स्वतःचा आयुष्याचे वाजलेले बारा मात्र ह्यांना काही केल्या निस्तरत नाहीत.
***शंतनू जोशी ***
ह्या लोकांना शिक्षण असो अथवा व्यवसाय काही केल्या जमत नाही. घरात वाद आणि बऱ्याचदा मारा मारी पर्यंत गेलेले वाद हे ह्यांचा कडे सामान्य असतात. सतत कर्ज दिवाळखोरी हि ह्यांची नेहेमीची दिनचर्याच बनते. बरं नोकरी करावी तर तिथे सुद्धा वाद , भांडण आणि राजकारण ह्यांना स्वस्थ बसू देत नाहीत. बुध ग्रह खराब का चांगला हे नेमकेपणानी तर चांगला ज्योतिषीच सांगू शकतो. पण आपला बुध ग्रह जर मीन किंवा धनु राशीत असेल, किंवा ६,८,१२ घरांमध्ये असेल तर आपल्याला वरील लक्षणं दिसण्याची शक्यता सगळ्यात जास्ती असते.
***शंतनू जोशी ***
उपाय -
१) खोटे बोलू नये
२) दारू , सिगरेट ,बिडी ,तंबाखू-गुटखा व्यसने सोडून द्यावीत
३) फक्त कामापुरतेच बोलावे. वायफळ बडबड आणि खर्च टाळावे.
४) भीमरूपी स्तोत्राचे १२०० पाठ दर वर्षी एकदा तरी करावेत. ६० दिवस रोज २० वेळा म्हणल्यास हे सहज शक्य आहे.
५) अमेथिस्ट क्रिस्टल ची अंगठी हातात जरूर घालावी

***शंतनू जोशी ***
ज्योतिषशास्त्र , अंकशास्त्र आणि वास्तुशास्त्र सल्लागार
पुणे

९५५२५९३९५१ - फक्त व्हॉट्स ऍप

दैनंदिन समस्या निवारण # ७ - दुकान चालत नाही - शंतनू जोशी


अनेक लोक हातातल्या नोकऱ्या सोडून व्यवसाय सुरु करतात. अनेक जण आजकाल शिक्षण सुद्धा अर्धवट करून घाई घाई मध्ये व्यवसाय उघडतात. अनेक गृहिणी काहीतरी करायच असे म्हणून एखादा घरगुती किंवा दुकान घेऊन व्यवसाय सुरु करतात. आणि कोणताही व्यवसाय सेट व्हायला वेळ हा लागतच असतो. पण अनेक लोक कमी कामात जास्ती पैसे मिळवण्यासाठीच व्यवसायात येतात.

अनेक जण ह्याच लालसेमुळे अनेक चुकीचे निर्णय घेतात. अनेक जण पटकन व्यवसाय उघडतात , कर्ज घेतात आणि जरा परिस्थिती अवघड झाली कि पळ काढतात. काही लोकांची ह्याचा विरुद्ध अवस्था असते. हे लोक कितीही अपयश आले , कर्ज झाली आणि भांडण झाली तरी व्यवसाय सोडत नाहीत. अनेक जण चुकीची partnership करून स्वतः मोट्ठ्या खड्ड्यात उडी मारतात ! मल्टीलेव्हल मार्केटींग स्कीम्स म्हणजे 'तुमचा' व्यवसाय न्हवे ! हा एक प्रकारे दलालीचा व्यवसाय असतो आणि बऱ्याचदा हा फसवाच असतो. पण अनेक भाबडी / मूर्ख ?! लोक ह्या जाळ्यात अडकतात आणि मग अनेक वर्ष कर्जबाजारी होतात.

***शंतनू जोशी ***

१) कधीही कोणताही व्यवसाय सुरु करताना एखाद्या चांगल्या ज्योतिषाला (नामवंत असेलच असे नाही) विचारावे कि मला व्यवसाय suitable आहे का नोकरी ? दुसरी गोष्ट म्हणजे ज्या क्षेत्राशी निगडित व्यवसाय करायचा आहे तो सूट होतो का ? भागीदारी करण्यासाठी जो भागीदार बरोबर आहे का ? भागीदारी योग्य आहे का नाही ? हे सर्व विचारूनच पुढे जावे म्हणजे पुढचे अनेक खड्डे चुकवता येतात.

२) दुकानाची वास्तू चेक केल्याशिवाय दुकान घेऊ नये !

३) मोट्ठे लोन घेताना ज्योतिषीय सल्ला घेणे चांगले .

३) दुकानात ईशान्य दिशेला चांदीचा वाटीत गुलाबजल मिश्रित पाणी ठेवून त्यात दक्षिणावर्ती शंख बुडवून ठेवावा.

४) दुकानाचा देव्हाऱ्यात कुबेर , लक्ष्मी , गणेश आणि बालाजी हे फोटो अवश्य ठेवावेत.

५) दुकानाचा गल्ल्यात कार्नेलियन क्रिस्टल चे ५ क्रिस्टल्स ठेवावेत !

६) दैनंदिन समस्या निवारण # २ आणि ५ मध्ये दिलेले उपाय करणे.

७) कोणतेही नवीन निर्णय घेताना शक्यतो नवरा /बायको आणि कामा निगडित व्यक्तींना सोडून कोणालाही त्या बद्दल सांगू नये.

८) आपण करीत असलेले उपासना , उपाय , व्रत वैकल्य इत्यादी लोकान समोर बोलू नयेत.

अविघ्नमस्तु !

शंतनू जोशी
ज्योतिषशास्त्र , अंकशास्त्र आणि वास्तुशास्त्र सल्लागार

पुणे

Friday, July 26, 2019

ज्योतिष आणि निसर्ग - शंतनू जोशी


ज्योतिषीय उपाय सगळेच काहीनाकाही करत असतात. पण हे करत असताना आपण निसर्गा साठी काही करूशकलो तर सोने पे सुहागा ठरेल. कारण निसर्ग हाच भारतीय धर्म आणि तंत्रशास्त्राचा आधार आहे. प्राकृतिक शक्तींचा सन्मान आणि त्यांच संवर्धन करणे हे अत्त्यंत आवश्यक आहे. प्रकृती नाही तर आपण नाही ! आपली प्रत्येक कृती हि आपल्यावर आणि निसर्गावर काही ना काही परिणाम नक्कीच करत असते.
१) स्वच्छता - आपल्या घरातील स्च्छता हि फार महत्वाची आहे. जुन्या तुटक्या फुटक्या वस्तू , गंजलेल्या लोखंडी वस्तू , बंद पडलेल्या वस्तू आणि धूळ घाण साठणे. ह्या सगळ्या मुळे शनी , राहू , केतू , मंगळ , नेपचून, युरेनस हे सर्व ग्रह खराब परिणाम द्यायला सुरुवात करतात. त्या मुळे आपले घर , कार्यालय , दुकान , सोसायटी सगळे अत्त्यंत स्वच्छ ठेवा. ह्या शिवाय बाहेर सुद्धा कुठेही घाण आणि कचरा पसरवू नका. नेहेमी सर्वत्र स्वचछता ठेवा म्हणजे सर्व ग्रह आधी पेक्षा चांगले परिणाम देतील.
२) पाणी वाया घालवणे - घरातील लीक होणारे नळ , भिंतींवर आलेली ओल आणि आपल्या टेरेस किंवा अंगणातील पाण्याची डबकी किंवा साठेलेलं घाणेरडे पाणी हे सर्व आपला चंद्र खराब करतात. ह्या मुळे आपल्याला शारीरिक , मानसिक, आर्थिक आणि कौटुंबिक त्रास वाढतात. आपल्या घरात , कार्यालयात आणि दुकानात कुठेही पाणी वाया घालवू नका. लिकेज सर्वत्र रिपेयर करून घ्या , भिंतीवरची ओल काढून टाका. आणि बाहेर जाल तेंव्हा सुद्धा नदी , तळी , समुद्र सर्व घाण करू नका . भारतीय संस्कृतीत आपण नदीला, समुद्राला, जलाशयाला पुजतो, पण अनेकदा लोक ह्याच नदीत कितीतरी कचरा टाकतात. समुद्रात दारूचा बाटल्या टाकतात. असे केल्याने निश्चितच हि घाण पस्रवणाऱ्यांना त्रास होणार. कोणत्याही प्रकारचे अजैविक म्हणजे नॉन बायोडिग्रेडेबल सामान , रसायन किंवा कचरा नदीत /समुद्रात / जलाशयात / विहरीत टाकू नये.
***शंतनू जोशी***
३) पक्षी पालन - बरेच लोकांना हौस असल्या मुळे पक्षी पिंजऱ्यात ठेवून घरात पाळतात. अश्या प्रकारे पक्ष्यांना कोंडून ठेवल्याने आपल्या पत्रिकेतील बुद्ध ग्रह खराब होतो आणि आपल्याला मोट्ठ्या प्रमाणात व्यापारात आर्थिक नुकसान होऊ शकते तसेच आपले व्यावसायिक संबंध खराब होऊ शकतात. त्या मुळे पिंजऱ्यातील पक्षी आपल्या वाढदिवस दिवशी विकत घेऊन नंतर काही काळानी ते पक्षी मोकळे सोडून द्यावेत. हे पक्षी अचानक मोकळे सोडल्यास मरू शकतात, त्या मुळे काही काळ त्यांना सवय होई पर्यंत ते पक्षी ठेवावेत आणि नंतर पक्ष्यांना बाहेर मुक्त राहण्याची सवय झाल्यावर कायमचे सोडून द्यावे.
४) मासे पाळणे - पक्ष्यां प्रमाणेच माश्यांना बंदिस्त ठेवणे हे आपल्या पत्रिकेतील शनी ग्रहाला क्षीण करत असते. ह्या पेक्षा aquarium मधील माश्यांना मुक्त करणे हे जास्ती पुण्याचे काम आहे.
५) गाय , कुत्री , कावळे ह्यांना गुळ पोळी , बिस्कीट इत्यादी खाऊ घालणे हे शत्रू पीडा , आरोग्य पीडा , कोर्ट कचेरी ची पीडा आणि कर्ज पीडा दूर करण्यास मदत करते.
६) मेष -सिंह -धनु ह्या राशीचा लोकांनी जमेल तितके बिल्व वृक्ष आणि औदुंबर वृक्ष लावल्यास असीम फायदे होऊ शकतात.
वृषभ - कन्या - मकर ह्या राशीचा लोकांनी वटवृक्ष , पिंपळ ह्याचे वृक्ष लावल्यास त्यांना लाभ होतो.
मिथुन - तूळ - कुंभ ह्या राशीचा लोकांनी तुळस आणि झेंडू ची जमेल तितकी झाड लावल्यास त्यांना लाभ होतो.
कर्क - वृश्चिक - मीन ह्या राशीचा लोकांनी आम्रवृक्ष , फणस वृक्ष इत्यादी लावल्यास त्यांना लाभ होतो .
ह्यात पुढे अजून भाग जोडण्याची ईच्छा आहे. ज्यात नक्षत्रानुसार वृक्षांची माहिती असेल आणि त्या नुसार कोणी कोणते झाड लावावे इत्यादी.
क्रमशः
ज्योतिषशास्त्र , वास्तूशास्त्र आणि अंकशास्त्र सल्लागार
9552593951 only what's app
शंतनू जोशी
पुणे

Monday, July 22, 2019

'अध्यात्म - गुरु - अनुभूती' - सत्य असत्य - शंतनू जोशी

सध्या सोशल मीडियाचा माध्यमातून अनेक विषय लोक उघड करून फेसबुक वर टाकतात. त्यामुळे सगळेच विषय मोकळ्यावर सगळ्यान समक्ष येतात. इतर विषयान प्रमाणे अध्यात्मिक विषयांवर सुद्धा खूप लिहिले बोलले जाते . हे सोशल मीडिया वर टाकावे का नाही हा वेगळा मुद्दा आहे. पण त्यातून काही विषय समजुती ह्या कशा चुकीचा झाल्या आहेत, भरकटल्या आहेत आणि त्या मुळे किती मानसिक , आत्मिक नुकसान माणूस करून घेतो हे हि दिसते .
तर अश्या अनेक विषयान पैकी एक म्हणजे संत आणि संतानुभव, आणि त्या मधून लोकांना आलेल्या अनुभूती इत्यादी. सध्या बहुत करून लोक देव सोडून गुरुं वर जास्ती भर देतात. आणि त्या गुरु भक्तीत ते आकंठ बुडालेले असतात. सर्व काही विसरून गुरु भक्ती आणि गुरु मय झालेले असतात .
तर गुरु भक्ती किंवा संत भक्ती ह्यावर माझा शून्य आक्षेप आहे . ज्याची त्याची श्रद्धा .
पण त्याच वेळी काही मुद्द्यांवर वैचारिक clarity फार महत्वाची असते आणि खूप मोट्ठ्या प्रमाणात हरवलेली दिसते म्हणून पुढील काही मुद्दे मांडतो. ह्यात काही चुकीचे समज आणि त्या मागील लोकांची कारण मीमांसा ह्या बद्दल मी बोलणार आहे.
गैर समज
नम्बर १) संतान शिवाय किंवा गुरूंशिवाय आपल्याला अध्यात्मिक प्रगती, अनुभव आणि मोक्ष मिळू शकत नाही.
उत्तर - ८४ लक्ष योनी फिरून मग एकदा मनुष्य जन्म मिळतो असे म्हणतात आणि मनुष्य जन्म हा एकमेव असा जन्म आहे ज्याच्यात मनुष्य अध्यात्मिक प्रगती करून घेऊ शकतो आणि नराचा नारायण बनवू शकतो ! विचार करा !!! नराचा नारायण होऊ शकतो ! म्हणजे एवढी क्षमता आहे ह्या मनुष्य जन्मात. त्या मुळे कोणीतरी तुम्हाला मार्गदर्शन केले नाही ,किंवा कोणी गुरु नसतील, तर तुम्हाला ते अनुभव/ ती प्रगती प्राप्तच होऊ शकत नाही, हे १००% अशक्य आहे. मुळात मनुष्य अहं ब्रह्मास्मि आणि तत् त्वं असी चा अनुभव घ्यायला आला आहे आणि जो परमेश्वर तुमच्या आत आहे त्याला तुम्ही स्वतः experience करू शकत नाही ?! हे शक्यच नाही.
उलट पक्षी तुमचा शिवाय दुसरा कोणीही माईचा लाल तुम्हाला ते अनुभव देऊ शकत नाही. तसेच तुम्हाला तुमचा इच्छे विरुद्ध वंचित सुद्धा ठेवू शकत नाही . दर्शन आणि स्वप्न इत्यादी अनुभूती ह्या संकेत असू शकतात. पण त्या गोष्टी परम अनुभव नव्हेत. परम अनुभव तुम्हाला फक्त एकाच माणूस देऊ शकतो. तुम्ही स्वतः.
२) गुरुं मध्ये आणि देवा मध्ये फरक नसतो. ते एकच असतात.
उत्तर - हेच तर सगळ्यात मोट्ठे असत्य आहे. गुरुं मध्ये परमेश्वर आहे निश्चित पण तो तेवढाच जेवढा समस्त मनुष्य , प्राणी आणि वृक्ष मात्रात आहे. संतान मध्ये आपल्या पेक्षा जरा जास्तीच देव भरलाय असे होऊ शकत नाही. आणि ते एकच असते तर संतांनी देवाची भक्ती , ध्यान, साधना केले नसते आणि त्या निगडित स्तोत्र, मंत्र आणि तंत्र अभ्यासले आणि रचले नसते. संतांनी स्वतः भगवत भक्तीच जास्ती केलेली आहे. मुळात गुरु म्हणजे तुमचा अंधकार मिटवणार माध्यम आहे. पण म्हणजे माध्यम हेच साध्य होत नाही. साध्य केवळ परमेश्वर. गुरुं मध्ये प्रकट होणारी दैवी शक्ती हि तुम्हाला ते गुरु / संत म्हणजेच देव आहेत असे दाखवण्या साठी नसून . हि महाशक्ती तुमच्यात सुद्धा आहे आणि जसे त्यांनी सामान्य मनुष्य असून सुद्धा ती शक्ती जागृत केली , उत्क्रांत केली तशीच ती तुम्हीही करू शकता हे दाखवून देण्या साठी आहे. ते समजायचे सोडून त्याच माणसाचे पाय धरून तोच देव आहे असे म्हणणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी असे आहे . मग त्यांनी दिलेल्या अनुभूती, शिकवण वाया गेले असा अर्थ होतो . त्या मुळे गुरूंचा आदर करावा पण परमेश्वर पहिले हे लक्षात ठेवावे.
३) आपलं एवढ नशीब नाही कि देव आपल्याला दिसेल किंवा बोलेल.
उत्तर - संतांना दिसू शकतो , त्यांच्याशी बोलू शकतो तर तो तुमच्याशी सुद्धा बोलू शकतो. जो देव तुमचा आत आहे तुमचाशी बोलू शकत नाही ?! हे अशक्य आहे. आणि मुळात देव दिसणे आणि देव बोलणे ह्या संकल्पनांचा पलीकडे गेले पाहिजे. देव हि शक्ती आहे माणूस नाही. त्याम उले देवाचा अनुभव येऊ शकतो. तो दिसेलच किंवा बोललच असे नाही. आणि दिसण्या बोलण्याची गरज आहे असे हि नाही. जो अनुभव देव देऊ शकतो तो कोणीच देऊ शकत नाही. आणि देव कोणती गोष्ट करू शकत नाही असे हि असू शकत नाही. पंगुम लंघयते गिरीम , मुकं वाचालं करोति ! पांगळ्याला चालवणारा आणि आंधळ्यांना दृष्टी देऊ शकणार , मुक्याला वाचस्पती बनवणारा परमेश्वर काहीही करू शकतो. तुम कितने यकीन और शिद्दत से कोशिश करते हो इस्पे बात बनती या बिगडती है. आणि हो संत आणि गुरु कितीही मिळाले तरी शेवटी स्वतः परमेश्वरा कडे मोर्चा वळवून स्वतःच तो परमानुभव साध्य करावाच लागतो. संत आणि गुरु तुमचा साठी शॉर्ट कट किंवा बाय पास काढू शकत नाही. ते तुम्हाला योग्य मार्ग दाखवू शकतात , चांगल्या गोष्टी शिकवू शकतात इतकेच.
४) आपल्याला मिळू शकतो देव पण ते अवघड असते आणि गुरुं मुळे ते सोप्पे होते.
उत्तर - असे काहीही होत नाही. असे असते तर सगळ्या संतांनी आणि गुरूंनी त्यांचा शिष्यांना तपश्चर्या, उपासना, साधना , ध्यान आणि सेवा करायला लावल्या नसत्या. थोड्यक्यात काय तर ये प्यास बुझाने के लिये खुद हि कुआ खोदना पडेगा ! गुरु तो सिर्फ खोदने जगह बता सकते हैं. औजार तो तुम खुद हो, लग जाओ काम पे.
क्रमशः
- शंतनू जोशी

ज्योतिष मर्म # १९ - विमशोत्तरी दशा आणि फळ. - शंतनू जोशी



ज्या लोकांना ज्योतिष विषयक माहिती नाही अश्यांना 'महादशा' म्हणले कि धस्स होतं !   त्यांना साडे साती प्रमाणे महादशा म्हणजे काहीतरी मोट्ठे संकट असे वाटते . मुळात साडे साती सुद्धा सगळ्यांसाठी संकट ठरत नाही तसेच महादशा सुद्धा ठरत नाही.  मुळात साडे साती हि फक्त आपल्या चंद्र राशी चा आधारे असते आणि शनीचा ट्रान्सीट/गोचर भ्रमणा नुसार असते.   पण महादशा हि त्याहून खूप सशक्त आणि मूलभूत संकल्पना आहे.

विमशोत्तरी दशा म्हणजे महादशा , अंतर दशा आणि प्रत्यंतर दशा, त्याचा पुढे सूक्ष्म दशा आणि प्राण दशा.   आपल्या जन्माचा वेळी चंद्र ज्या नक्षत्रात होता त्या नक्षत्र स्वामीची महादशा तुम्हाला जन्माचा वेळी होती.  आणि मग आपण जसे मोट्ठे व्हाल तसे विशिष्ट सिक्वेन्स मधे एका मागे एक सर्व ग्रहांचा दशा आपल्याला लागू होत जातात.  ज्योतिष शास्त्रामधे आपल्या आयुष्याचे भविष्य कथन करायचे असेल तर आधी तुमचा आयुष्याचा काळ विभागता आला पाहिजे. विभाग केल्या शिवाय आपण एखादी घटना नेमकी कधी घडेल हे सांगू शकणार नाही.  त्या मुळे विमशोत्तरी दशा पद्धती हि ज्योतिषाचा पाया मानली पाहिजे.  विशिष्ट ज्योतिषीय गणितानुसार हे प्रत्येक ग्रहासाठी निश्चित केलेले वेग वेगळे (unequal) कालखंड हेच खरे तर फलज्योतिषचा पाया आहेत. 

तर मुळात विमशोत्तरी म्हणजे १२० वर्षांचा काल खंड.  मग त्या काल खंडाचे प्रत्येक ग्रहाचा गणितानुसार ९ विभाग केले जातात,  त्यांना महादशा असे म्हणले जाते.  ह्या महादशेत पुन्हा ९ विभाग केले जातात त्यांना अंतर दशा म्हणतात.  आणि अंतर्दशेचे पुन्हा ९ विभाग केले जातात ज्यांना प्रत्यंतर दशा म्हणले जाते.  आणि मग तशाच प्रमाणे पुढे सूक्ष्म आणि प्राण दशा सुद्धा असतात.  मग तदनुसार तुम्हाला त्या त्या कालखंडात त्या त्या ग्रहांचे परिणाम मिळणार. ग्रहांचे फळ हा एक स्वतंत्र विषय आहे त्यावर पुन्हा केव्हा तरी.

काळजी नसावी
शंतनू जोशी

ज्योतिष मर्म # १८ - Transit Astrology - शंतनू जोशी


आपण सर्वांनी अनेक ठिकाणी असे लेख वाचले असतील, ज्यात असे लिहिलेले असते कि अमुक तमुक ग्रह अमुक राशीतून आता दुसऱ्या राशीत जात आहे . आणि आता ह्या अनुषंगाने १२ राशींवर होणारे परिणाम. दर काहीदिवसांनी हे लेख येत असतात. हे लेख, व्हिडीओ इत्यादी अश्या पद्धतींनी लिहिले किंवा बनवलेले असतात कि जणू काही अनेक वर्षांनी काहीतरी नवखाच योग बघायला मिळणार आहे. ज्योतिष विषयाची आवड असणारी, पण अभ्यास नसलेली मंडळी अश्या गोष्टीं मध्ये खूप रुची दाखवतात. साहजिकच त्यांना आपल्या राशीला चांगले फळ दिसल्यास ते हुरळून जातात, आणि वाईट असल्यास लगेच खजील होतात. ज्यांची सध्या परिस्थिती खराब असते ते वाईट फळ वाचून फारच घाबरतात.
तर मुळात हे आहे काय ? तर गोचरी किंवा ट्रान्झिट ऍस्ट्रोलॉजि. म्हणजे आज आत्ता 'दृष्टी गोचर' होणारी ग्रहस्थिती ! आणि त्याची कुंडली मांडून केलेला अभ्यास.
आता ग्रह , राशी , नक्षत्र , पृथ्वी , चंद्र , सूर्य इत्यादी सर्वच सतत गोल गोल फिरत आहेत. तुम्ही दिवसभर बसून जवळ पास दर तासाला कुंडली बनवू शकता. एवढच काय काही काही मिनिटांनी सुद्धा बघू शकता. पण ह्याचा उपयोग किती आहे ? आणि नेमका तो कसा करायचा ?
वरील लेख आणि विडिओ इत्यादी, ज्याच्यात असे सांगितले जाते कि अमुक ग्रह, अमुक राशीतून दुसऱ्या राशीत गेला आणि आता त्या वरून बारा राशींच भविष्य, इत्यादी ! तर मुळात रास, म्हणजे चंद्र रास. अर्थात असे लिहिताना सध्याचा ग्रहस्थितीचा अभ्यास चंद्र राशी सापेक्ष केला जातो आणि फळ सांगितले जाते. पण बाकीचा बारा ग्रहांचे आणि बारा राशींचे काय ? लग्न राशीचे काय ? आणि हे होणारे बदल नक्की किती वेळा बघणे शक्य आहे ? कारण ग्रह , राशी , नक्षत्र , पृथ्वी , चंद्र , सूर्य इत्यादी सर्वच सतत गोल गोल फिरत आहेत. अश्या सतत variable असलेल्या data मधून तुम्ही किती माहिती मिळवू शकाल ? आणि ती किती accurate / काटेकोर असेल ? तर मुळात ह्याला काही भक्कम पाया नसेल, तर तुम्ही फक्त ट्रान्झिट बघून बघून चक्कर येऊन पडाल, पण हाती काहीच लागणार नाही.
हा भक्कम पाया म्हणजे काय ? तर तुमची जन्म लग्न कुंडली ! आणि त्याचनुसार गणना केलेल्या तुमचा ग्रह दशा ! हाच तुमचा आयुष्याचा syllabus आहे असे समजा. आणि ज्योतिषात तुम्ही काहीतरी छेड छाड़ केल्या शिवाय out of syllabus काहीही येत नाही.
तर आता आपण बघू ट्रान्झिट ज्योतिषाचे फायदे आणि उपयोग.
१) ट्रान्झिट ज्योतिषाचा खरा उपयोग किंवा हुकूम का इक्का काही असेल तर ती म्हणजे प्रश्न कुंडली ! म्हणजे तुमचा प्रश्नांची कुंडली आपण मांडू शकतो आणि त्या मुळे तुम्हाला त्या प्रष्णाशी निगडित उत्तर देता येते. ज्यांना स्वतःची जन्म तारीख, वेळ किंवा ठिकाण काही माहिती नाही अश्यांना सुद्धा प्रष्ण कुंडली द्वारे मार्गदर्शन करता येते. एखाद्याने विचारले कि मला परीक्षेत यश येईल का नाही तर साधारण फळ तुम्हाला जन्म लग्न कुंडली वरून देता येईल. पण एका परीक्षे मधील विविध विषयांचे पेपर कसे जातील? असे कोणी विचारले तर ते प्रष्ण कुंडलीनुसारच सांगणे शक्य होईल.
२) जन्म लग्न कुंडली मधील फलित हे विमशोत्तरी दशेवर आधारित असते आणि ह्यात अनेकदा बरेच मोट्ठे कालखंड असतात. अश्या वेळी ह्यातील एखाद्या कालखंडात एखादी घटना नेमकी कधी घडेल हे सांगताना ट्रान्झिट चा वापर करता येतो. पण मुळात आधी दशांचा अभ्यास नीट झाल्यावरच.
३) देशाचे हवामान , शेती , इकॉनॉमी , पाकृतीक आपदा, युद्ध इत्यादी गोष्टी ट्रान्झिट वरून बघाव्या लागतात.
४) काही अंशी शेयर मार्केट मधील उतार चढाव हे ट्रान्झिट वरून वर्तवले जाऊ शकतात.
५) पूर्वी काही निष्णात वैद्य मंडळी औषधी गोळा करण्यासाठी आणि उपचार करताना ट्रान्झिट चा अभ्यास करीत असत.
६) वास्तुशास्त्रासाठी वास्तु परीक्षण करताना ट्रान्झिट चा वापर निष्णात वास्तुतज्ञ करतात.
ह्या व्यतिरिक्त ट्रांझीटचा कोणताही उपयोग नाही. ग्रह राशीबदल हे सतत चालू असतातच. जो पर्यंत तुमचा जन्म लग्न कुंडलीचा अभ्यास झालेला नाही, तो पर्यंत केवळ ग्रह राशी बदलाचा आधारे केलेली भाकितं ही चुकीची ठरतात. जो पर्यंत एखाद फलित जन्म लग्न कुंडलीत नाही, तो पर्यंत ते फळ फक्त ट्रान्झिट मुळे तुम्हाला मिळूशकत नाही! आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार..? जन्म लग्न कुंडलीचा पूर्ण विचार झाल्यावर विशिष्ट कालखंडात काही फळांची तीव्रता आणि घटनेची वेळ ट्रान्झिट वरून काढता येते . उदाहरणार्थ गेल्या वर्षी माझ्या एका मित्राची कुंडली बघत असताना काही अपघात योग दिसत होते . ट्रान्झिट मधून मी त्याला 'तीन तारखा' सांगितल्या आणि ह्या तीन दिवसान पैकी एका दिवसात संध्याकाळी ४:३० नंतर अपघात होण्याचा योग आहे असे सांगून काळजी घेण्यास सांगितले आणि काही उपाय इत्यादी सुचवले. त्या नुसार मित्रानी उपाय केले आणि पहिल्या दोन तारखांना त्या वेळेत घराबाहेर पडणे टाळले. पण तिसऱ्या तारखेला एका महत्त्वाचा कामामुळे बाहेर जावे लागले. संध्याकाळची वेळ , कल्पना असल्या मुळे मित्र एरवी पेक्षा गाडी सावकाश नेत होता. एका सिग्नलला थांबलेला असताना एका मोटरसायकल चालकानी मागून मित्राचा गाडीला धडक दिली . पण सुदैवाने ज्यानी धडक मारली तोच गाडी सह खाली पडला आणि मित्राचा गाडीला किंवा शरीराला कोणतीही दुखापत झाली नाही. फक्त हातातील घड्याळाचा स्ट्रॅप तुटला इतकेच.
अशा पद्धतींनी ट्रान्झिट ज्योतिषाचा वापर करता येतो. योग्य रितीनी वापरल्यास ह्यानी खूप फायदा होईल. पण विनाकारण अर्धवट पद्धतींनी बघितल्यास नुकसान होईल. आपण सर्वांनी अश्या गोष्टी वाचून अथवा ऐकून मनावर घ्यायच टाळा. आणि फक्त योग्य पद्धतीचा अवलंब करा आणि फायदा करून घ्या.
काळजी नसावी !
शंतनू जोशी

ज्योतिष मर्म # १७ - ' नास्तिक लोकांचेच चांगले होते, आणि देव धर्म करणार्यांचेच वाईट होते!!! - शंतनू जोशी


आजकाल फेसबुक वर आणि प्रत्यक्ष सुद्धा अनेक लोकांना असा विलाप करताना मी ऐकतो कि - ' नास्तिक लोकांचेच चांगले होते, आणि देव धर्म करणार्यांचेच वाईट होते!!! '
मग त्यावर ठराविक उदाहरण दिली जातात कि अमुक तमुक कसे काहीच देवाचे करत नाहीत तरी लक्ष्मी त्यांचा कडे म्हणे पाणी भरते पण आमचे कोणीतरी अनेक पूजा , विधी इत्यादी करतात, त्यांनी अमक्या तमक्यांची अनुग्रह दीक्षा घेतली तरी त्यांची सर्व बाजूनी वाट लागली लागली इत्यादी !
मग काही सम दुःखी लोक भर घालतात कि अंबानी काय पूजा करतो का ? अंबानी काय वास्तुशास्त्र बघून अँटिलीया बांधतो का ? शाहरुख खान काय पितरांचे श्राद्ध करतो का वगैरे वगैरे 
तर आता असं आहे कि पहिली गोष्ट म्हणजे तुमचे दुसऱ्याचा लक्ष्मी वर इतके लक्ष का आहे ?! तुम्ही तुमचा स्वतःचा विचार करा आणि स्वतःच निस्तरा , तेवढं जमलं तरी पुरेसे आहे. अंबानी ला पैसे का मिळतात आणि भ्रष्ट नेत्यांना वगैरे पैसे का मिळतात त्याची काळजी आणि पंचायत नंतर करू.
पहिला मूल भूत सिद्धांत असा कि काहीतरी घडते आहे म्हणजे त्या मागे नक्कीच काहीतरी कारण असणार. विनाकारण ह्या जगात काही होत नाही ! एखादा माणूस श्रीमंत आहे म्हणजे तो नक्कीच काहीतरी बरोबर करत असणार म्हणूनच तो श्रीमंत आहे ! आणि एखादा गरीब किंवा कर्ज बाजारी मध्यम वर्गीय हा गरीब आहे म्हणजे तो काहीनाकाही चुकतोय किंवा चुकला आहे म्हणूनच तो गरीब आहे.
आता प्रारब्ध वगैरे सगळेच सांगतात म्हणून त्यावर मी बोलत नाही. पण प्रारब्ध म्हणजे काय ? तर तुमची कर्म ! आणि 'बुद्धी कर्मानुसारींणी' हा सिद्धांत आहे ! म्हणजे तुमचा नशीब किंवा करमा मुळे काय होते तर तुमची बुद्धी चांगली चालते किंवा नशीब बिघडलं कि बुद्धी भ्रष्ट होते. त्या मुळे माणूस चुकीचे निर्णय घेतो , चुकीची कृती करतो आणि मग फळ भोगतो !
आता वास्तविकता अशी आहे कि बऱ्याचदा हे जे काही बोललं जातं कि अमुक तमुक काहीच देव धर्म करत नाही इत्यादी , हे सगळं फक्त assumption वर बेस्ड असत. म्हणजे त्यात तत्थ्य काहीच नसतं. खरंतर अनेक मोट्ठे industrialists , नेते , अभिनेता , बिल्डर इत्यादी सर्व लोक हे मोट्ठ्या प्रमाणावर पूजा उपासना ध्यान धारणा इत्यादी करतात ! तसेच दान धर्म सुद्धा करतात ! फक्त ते अश्या गोष्टी गावभर बोंबलून सांगत नाहीत. ह्यातील काही लोक वरकरणी नास्तिक वाटले तरी कळत न कळत ते दान धर्म किंवा काही ना काही बरोबर अध्यात्मिक कृती करत असतात ! ज्या मुळे आपसूकच त्यांची प्रगती होत जाते. अनेक नास्तिक लोक हे नास्तिक असतात पण अवडंबर न करता अनेक सत्कार्य करतात.
आणि अगदी अंबानी पासून विजय मल्ल्या पर्यंत सर्व लोक नियमित तिरुपती बालाजी ला जाणे , वास्तू शास्त्र फॉलो करणे , रत्न घालणे , नारायण नागबली करणे , वास्तुशांत करणे , देवळांना आणि पुरोहितांना देणग्या देणे इत्यादी कार्यक्रम करतात. आता तुम्ही म्हणाल बिल गेट्स , वॉरेन बफे काय करत होते ? तर ते तेंव्हा सुद्धा आणि आज सुद्धा जग भरात दान वीर म्हणून ओळखले जातात. रॉकफेलर सारखी लोकं सुद्धा अगदी न चुकता चर्च मध्ये देणग्या देत ! मोट्ठे मोट्ठे industrialists आज सुद्धा महत्त्वाचे कॉँट्रकेट्स यमगंड काळ , राहू काळ इत्यादी सोडून शुभ मुहूर्तावर करतात ! त्या साठी पुरोहित आणि ज्योतिषांची टीम ह्या लोकांनी ठेवलेली असते. अगदी election कॅम्पेन चा आधी सुद्धा मुहूर्त , वास्तू आणि सर्व काही बघून मग प्रचार सुरुवात करणारे अनेक यशस्वी नेते मंडळी आहेत. अगदी काही मुक्ख्यमंत्री इत्यादी ह्यात सामील आहेत .
दुसरी कडे सो कॉल्ड धार्मिक मंडळी करतात इंच भर आणि गाव भर सांगतात हात भर ! म्हणजे प्रचंड दांभिकपणा ! छोटुकली साधी एक सत्यनारायण पूजा केली कि लोक अक्ख्या सोसायटीला आमंत्रण करतात !  . एखादा गणेश याग वगैरे केला कि अगदी मेन रोड पासून सगळी कडे बॅनर्स लावतात ! जणू काही फारच मोठ्ठा पराक्रम ह्यांनी केलेला आहे ! मला असे लोक माहिती आहेत जे दर महिन्याला महारुद्र करतात आणि दर वर्षी अतिरुद्र स्वाहाकार करतात ! आणि तरी कानोकान खबर होत नाही. पण सो कॉल्ड सज्जन आणि सामान्य समाज हा फेसबुक पासून सगळी कडे आपल्या देवघराचे आणि पूजेचे फोटो टाकताना दिसतो . स्वप्नात कोण आलं गेलं अनुभूती प्रचिती इत्यादी फण्डे मारत फिरत असतो ! आणि काही माहिती नसताना शास्त्र आहे असे लेबल लावून लोकांना अक्कल पण शिकवत असतो. आपल्या उपासनेचा पत्ता नसतो आणि लोकांना पूजा, धार्मिक कर्तव्य आणि आन्हिकाचे धडे देत फिरत असतो.
आता महत्त्वाचा मुद्दा - हे लोक जे अगदी मनोभावे करत असतात ते चुकीचा पद्धतींनी करत असतात, त्या मागचे तत्थ्य धड माहिती करून न घेता करत असतात, अर्धवट गोष्टी सोयीनुसार करतात. काहीवेळा उगाचच अतिरेकी सोवळं आणि कर्मकांड करतात आणि हीच लोक एरवी सामान्य नीतिमत्ता सोडून वागतात . आणि जिथे पाहिजे तिथे महत्त्वाचा नियम मोडून स्वतःचा अकलेचा वापर करतात. नको तिथे अधोगामी आणि नको तिथे पुरोगामी ! कुठल्यातरी नकोत्या माणसाचा आहारी जाऊन त्याला गुरु मानून बसलेले असतात ! कोणत्यातरी संस्थेचे ऐकून पूर्वापार चालत आलेले विधी बदलतात ! चुकीचे मंत्र जप करतात, चुकीचा पद्धतींनी करतात, चुकीचे दैवत पूजतात ! चुकीचा ठिकाणी म्हणजे कोणत्यातरी मठात किंवा कोणत्यातरी अंगात वगैरे येणाऱ्या बुवा कडे आरतीला जा , दर्शनाला जा देणग्या दे असले उद्योग करतात ! कोणाचाही पाया पडतात आणि डोक्यावर हात ठेवून घेतात !
आणि मग एवढं करून झालं कि म्हणतात चांगल्या माणसांनाच त्रास होतो ! 
पहिली गोष्ट म्हणजे देवाचं तुम्ही काहीही करू शकत नाही ! देवच तुमचं करत असतो ! आणि लक्ष्मी दारात पाणी भरते इत्यादी वेडसर वाक्प्रयोग जो पर्यंत आहेत तो पर्यंत लक्ष्मी हि काय शक्ती आहे हे कळूच शकत नाही . ती मिळण्याची तर बातच सोडा ! श्री लक्ष्मी हि देवता आहे शक्ती आहे आधी त्या मातेचा उल्लेख आदराने करायला शिका ! जो धनवान असतो तो लक्ष्मीमातेचा दाराशी पाणी भरत असतो ! लक्ष्मीमाता कोणाचा घरी पाणीबिणी भरत नाही !
फक्त पूजा , फक्त वास्तू , फक्त ज्योतिष किंवा फक्त कष्ट ह्यातलं काहीही करून तुम्ही कधीही एक्सट्राऑर्डिनरी काहीही करू शकत नाही. एखादी गोष्ट व्हायला अनेक गोष्टी व्हाव्या आणि कराव्या लागतात. त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि बरोबर पद्धतींनी , बरोबर टायमिंग आणि sequence नीच.
माणूस चांगला वागतो का ? मनानी चांगला आहे का नाही? हे महत्त्वाचे आहेच पण त्याहून महत्त्वाची कृती आहे ! नुसती श्रद्धेनी पूजा केली कि काम होत नाही! पूजा technically सुद्धा बरोबर पाहिजे , बरोबर दैवताची पाहिजे , योग्य प्रमाणात पाहिजे ! तरच ती फलद्रुप होते. पण लोकं टीव्ही आणि पुस्तक बघून जे दिसेल आणि रुचेल ते करत सुटतात आणि म्हणूनच, मजबूत आर्थिक आणि इतर फटके सुद्धा लोकांना बसतात.
टीव्ही वर येणारे पुस्तक लेखक इत्यादी मंडळी सगळ्यांना घाऊक मध्ये काहीतरी करायला सांगतात. ह्यात व्यक्तिगत गोष्टींचा काहीच विचार केलेला नसतो. तसेच अनेकदा हे सर्व टीव्ही वर येऊन किंवा पुस्तकं लिहून झटपट श्रीमंत होण्यासाठी असतं त्या मुळे त्यातसुद्धा भरपूर गोष्टी ह्या अश्याच चिकटवलेल्या असतात. त्यांना पडताळा , तंत्राधार , परिणाम , अनुभव आणि अभ्यास कशाचाच आधार नसतो.
योग्य पद्धतींनी केलेली उपासना , पूजा, धार्मिक कार्य इत्यादी १००% फळतेच ! त्या मुळे तुम्ही करून पण काही योग्य घडत नसेल तर नक्कीच तुम्ही कुठेतरी चुकताय ! ते सुधारा म्हणजे परिणाम येणारच !
गुंड , भ्रष्ट मंडळी इत्यादी लोक हे पापी आहेत म्हणूनच त्यांना धन लाभ होत नाही. त्यांच नीट मार्गानी काहीच चांगल होत नाही म्हणूनच त्यांना चोऱ्या माऱ्या करून हिसकावून पैसा घ्यावा लागतो. आणि असा आलेला पैसा हा नेहेमीच त्या माणसाला अजून बदनामी , आरोग्य विषयक त्रास , शत्रू , कोर्ट कचेऱ्या देतो . आणि अश्या लोकांना मृत्त्यू सुद्धा रोगांनी , अपघातांनी आणि अकस्मात येतो. ह्या लोकांची मुलं आणि घरचे ह्यांचा आरोग्यात , कौटुंबिक जीवनात असंख्य लफडी असतात. आणि अश्या अनेकांची तरुण मुलं वगैरे त्यांचा देखत अपघातांना इत्यादी बळी पडतात. पण हे सर्व वाईट जे होतं ते लोक बघत नाहीत. कारण बघणाऱ्या माणसात सुद्धा विकृती आहे. त्याला दिसते ती त्याची गाडी , नोकर आणि छानछोकी. त्याचा आड किती चिंता त्याला पोखरत असतात हे तुम्हाला माहिती नाही. अश्याच लोकांमध्ये आणि त्यांचा घरांमध्ये आत्महत्त्येचे प्रमाण जास्ती आहे. आणि हे सर्व माहिती असते म्हणूनच हे लोक घाबरून का होईना दान धर्म पण करतात, अशी दान करणारी लोकं त्यातल्या त्यात बऱ्या अवस्थेत टिकतात .
त्या मुळे वाचक हो कृपया दुसर्या कडे न बघता स्वतः कडे बघावे. आत्म मंथन करावे , स्वतःत सकारात्मक बदल करावे , आपले दोष शोधून भस्म करावेत आणि आपली कृती हि नीट आखून करावी ! म्हणजे यश हे चांगल्या आणि हुशार माणसालाच मिळते. आणि ह्या जगात हुशार, चांगली आणि कष्टकऱणारी अनेक आहेत. जो पर्यंत त्यांना दैवी शक्तीची साथ मिळत नाही तो पर्यंत त्यांचा आयुष्यात 'भव्य यशाची ठिणगी' पडत नाही हे लक्षात ठेवा !
काळजी नसावी
शंतनू जोशी

ज्योतिष मर्म # १६ - कोजागरी - शंतनू जोशी


कोजागरी म्हणलं कि लोकांचा मनात खूप कुतूहल असतं. आणि विशेष करून ते कुतुहूल, सगळ्यांनी एकत्र येऊन रात्री चंद्र प्रकाशात मसाला दूध पार्टी करायची ह्या विचारांमुळेच असतं ! पण कोजागरी पौर्णिमे बद्दल अजून काय विशेष आहे आणि ह्या दिवशी उपासना दृष्टींनी काय करण्यासारखे आहे हे आज आपण जाणून घेऊया.
सर्वप्रथम 'कोजागिरी' असा शब्द नसून 'कोजागरी' असा शब्द आहे. आणि हा संस्कृत मधील 'को जागर्ति ' ह्या वरून आलेला शब्द आहे. तर ह्या को जागर्ति चा अर्थ काय ? हे आपण पुढे जाणून घेऊया. पण त्या आधी आपण हे मसाला दूध पिण्याच नेमक कारण आणि पद्धत काय असावी ह्या बद्दल जाणून घेऊया. वर्ष भर जा काही पौर्णिमा येतात त्यातील कोजागरी पौर्णिमा हि विशेष मानली जाते. ह्याच कारण म्हणजे ह्या दिवशी आकाशात जी चंद्राची कला दिसते तिला 'अमृत कला' असे म्हणले आहे. ह्या दिवशी जी चंद्र कला दिसते, तिला अमृत कला म्हणण्याचे कारण म्हणजे, ह्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ येतो. आणि त्या मुळे चंद्राचा पृथ्वीवरील जलाशयांवर , माणसानवर , प्राण्यांनावर आणि वनस्पतींवर होणारा परिणाम सर्वाधिक असतो. ह्या दिवशी जो चंद्र आपल्याला दिसतो त्या चंद्राचा प्रकाश आयुर्वेदानुसार आरोग्यास उत्तम मानला गेलेला आहे.
ज्योतिषानुसार बघता ह्याचा वापर आपल्या जन्म कुंडली मधील चंद्र बळ वाढवण्यासाठी केला जाऊ शकतो. जन्म कुंडली मधील बलवान चंद्र हा विशेष करून कलाकार , लेखक , चित्रकार , डिझायनर, गायक , वादक, नर्तक , फिल्म इंडस्ट्रीमधील लोकं इत्यादीं साठी विशेष महत्त्वाचा असतो. चंद्र कृपेशिवाय ह्या क्षेत्रानमध्ये यश नाही ! तसेच सट्टा , रेस आणि शेयर मार्केट संबंधित व्यक्तींना सुद्धा बलवान चंद्र खूप महत्त्वाचा ठरतो. कारण वरील सर्व कामान मधे पब्लिक सेंटीमेंट चा खूप मोठ्ठा हात आहे. पब्लिक सेंटीमेंट तुमच्या बाजूनी नसेल, तर तुमचे डाव उलटू शकतात. आणि पब्लिक सेंटीमेंट वर सर्वाधिक प्रभाव करतो तो म्हणजे चंद्र ! कारण चंद्र हा मनाचा आणि भावनांचा कारक आहे ! ज्यांना गर्भधारणा होत नाहीये किंवा ज्या नवमातांना दूध तयार न होण्याची समस्या आहे त्यांना सुद्धा चंद्र बलवान करणे गरजेचे आहे. म्हणजे काय तर आपल्या शरीरातील चंद्राशी निगडित असलेले सर्व घटक वाढवणे गरजेचे आहे. आणि आपल्या शरीरातील जवळ जवळ सगळे हार्मोन्स हे चंद्राचा अधिपत्त्या खाली येतात. ज्यांना शांत झोप लागत नाही त्यांचा साठी सुद्धा पुढील क्रिया फायदेशीर ठरू शकते.
तर ह्या दिवशी मसाला दूध पिण्याची परंपरा रूढ झालेली आहे. वास्तविक असं का ? तर ह्या कोजागरी पौर्णिमेला जो चंद्र दिसतो त्या चंद्राचा प्रकाश आपल्याला मिळवायचा आहे. तर कोजागरी पौर्णिमेला रात्री चंद्र उदयानंतर थोडे आटवलेले आणि केशर सुकामेवा मिश्रित दूध चंद्र प्रकाशात ठेवले जाते. शक्यतो एखाद जाळीदार झाकण त्या वर ठेवले जाते जेणे करून चंद्र प्रकाश त्यातून दूधा पर्यंत पोचेल पण कोणती इतर घाण धूळ इत्यादी त्यात पडणार नाही . हे दूध रात्र भर किंवा निदान ३-४ तास चंद्र प्रकाशात ठेवावे आणि मग हे दूध प्यावे, शक्यतो पुढचा सकाळी प्यायल्यास उत्तम . जेणे करून चंद्राचा अमृत कलेचा प्रकाश हे दूध शोषून घेईल आणि मग आपल्याला त्या अमृत प्रकाशाचा लाभ होईल . तसेच पत्रिकेत असलेल्या चंद्राचे बळ आपल्याला वाढवता येईल.
आता हे सगळे करत असताना मुद्दाम गायन वादन आणि इतर काही खेळ इत्यादी कार्यक्रम करण्याची पद्धत आहे. कारण ह्या दिवशी जास्तीत जास्ती वेळ चंद्र प्रकाशात बसण्याचे खूप महत्त्व आहे. तसेच कोजागरी हा लक्ष्मी उपासनेसाठी सुद्धा हा विशेष दिवस मानला जातो. अशी मान्यता आहे कि ह्या दिवशी रात्री १२ पासून पुढे लक्ष्मी देवी इंद्राचा ऐरावत वाहनावर बसून आकाश भ्रमण करते. आणि हे करत असताना ती विचारत जाते को जागर्ति ? को जागर्ति ? म्हणजेच कोण जागे आहे ?! त्या मुळे कोजागरी पौर्णिमेला रात्री १२ चा सुमारास लक्ष्मी उपासना करण्याचे विशेष महत्त्व आहे. ह्या काळात करायची पूजा उपासना मंत्र हे व्यक्तीचा जन्म कुंडली नुसार असले तर सर्वोत्तम फलप्राप्ती होऊ शकते. पण ज्यांना हे शक्य नाही त्यांनी 'लक्ष्मी चालिसा' स्तोत्राचे १६ पाठ करावेत. हि उपासना धन लाभ आणि प्रसिद्धी वाढवण्यासाठी सर्वोत्तम आहे.
तर अश्या पद्धतीनी कोजागरी पौर्णिमेचा लाभ सर्वांनी घ्यावा. आणि ज्यांना वरील काही समस्या , त्रास आहेत त्यांनी आणि ज्यांना काही त्रास नाहीयेत त्यांनी त्यांचा यशोवृद्धी आणि आयुरवृद्धी साठी वरील उपचार करावेत .
काळजी नसावी
शंतनू जोशी
* ज्योतिष मर्म series मधील इतर लेख वाचण्या साठी search करा * 'ज्योतिष मर्म # '

ज्योतिष मर्म # १५ - ज्योतिष - वास्तू विषयक समज , गैर समज , सत्त्य, श्रद्धा -अंध श्रद्धा इत्यादी- शंतनू जोशी


१) दारू , बिडी सिगरेट विकणारे , मटण विकणारे , बार , पब चालवणारे , डान्स बार चालवणारे इत्यादी मंडळी ज्योतिष वास्तू बघत नाहीत तरी त्यांना फायदा होतोच कि. अश्या आशयाचे काही जोक्स मध्यन्तरी लोक(खुळचट) शेयर करत होते.
२) राजकारणी लोक ज्योतिष वास्तू मानत नाहीत तरी त्यांना फायदा होतो.
३) बिल्डर मंडळी मानत नाहीत.
४) इतर धर्मीय ह्या गोष्टी मानत नाहीत.
५) नास्तिक लोकांना ह्या असल्या गोष्टी करून काही नुकसान होत नाही . कसे काय ?
६) जैन , मारवाडी , सिंधी हे लोक कुलाचार कुलधर्म ज्योतिष वास्तू काही न मानता न करता पण त्यांचा धंदा चालतेच कि !
हे सगळे प्रश्न अनेकदा येतात. स्वतःला स्वतःच सभ्य समाज म्हणवून घेणारी मंडळी हे प्रश्ण विचारण्यात सगळ्यात पुढे असतात. स्वतःला विज्ञान अधिष्ठित म्हणणारे पण ह्यात असतात.
मी स्वतः गेली ५-६ वर्ष जो काही अनुभव घेतला तो ह्याचा १००% विपरीत आहे !
मी स्वतः हॅन्डल केलेल्या केसेस मध्ये राजकारणी मंडळी , बिल्डर्स , बार मालक , मटण विक्रेता, पोर्क विक्रेता , पब मालक , मुसलमान लोक , ख्रिस्ती लोक , पारशी , जैन मारवाडी , सिंधी , डॉक्टर , IT कंपनी मालक , बौद्ध लोक, सट्टा करणारी लोकं अश्या सर्व प्रकारची,सर्व जाती धर्माची आणि सर्व बॅकग्राऊंडची लोक आहेत.  त्यांनी त्यांचा व्यवसाय वाढ , पगार वाढ , आरोग्य , निवडणूक जिकणे इत्यादी विविध कारणान साठी सल्ले मागितले.
इतर धर्मियांनी लग्नासाठी गुण मिलन करवून घेतले. नामकरण करताना कोणते नाव योग्य ठरेल ह्या बद्दल माहिती घेतली.
विशेष म्हणजे ह्या लोकांनी सांगितलेल्या गोष्टी जास्ती मनापासून आणि लक्षपूर्वक केल्या. जास्ती पाल्हाळ लावली नाही. त्यांना मिळालेल्या परिणामान बद्दल न विसरता मला कळवले. स्वतःचे इतर अनुभव बाजूला ठेवून प्रोफेशनल पद्धतीने माझे सर्व सल्ले ऐकून फॉलो केले. एकवेळ मी पैश्यां बद्दल मागणी न करता सुद्धा चार वेळा विचारून देणे. उपायाचा प्रॅक्टिकल अर्थ मी नेहेमीच समजावून सांगतो तो ऐकून लक्षात ठेवणे आणि योग्य पद्धतींनी ती माहिती वापरणे. काळ वेळ आणि प्रोफेशनल boundaries चे भान ठेवणे. ज्योतिष आणि वास्तू मधून नेमकी काय अपेक्षा ठेवावी हे ह्या लोकांना पक्क माहिती असतं.
स्वतःला सब्भ्य , विज्ञान अधीष्ठीत वगैरे समजणाऱ्या दीड शहाण्या लोकांनचे अनुभव :
१) पाल्हाळ लावणे . प्रश्णच विचारता येत नाही. आपल्याला नक्की काय हवे आहे हे सुद्धा सांगता येत नाही.
२) सांगितलेल्या गोष्टी दिरंगाईने , अर्धवट आणि चुकीचा करून ठेवणे.
३) दुःखाचे रडगाणे सांगायला रोज फोन करून त्रास देणे , पण फायदा झाल्यास मेसेज करायची सुद्धा तसदी न घेणे . म्हणजे त्यांनी धन्यवाद करावा म्हणून नाही. सांगितलेल्या गोष्टींचा अपेक्षित परिणाम आला का नाही एवढी माहिती द्यायला सुद्धा लोक तसदी घेत नाहीत. नकारार्थी गोष्टी आवर्जून कळवतात. सकारात्मक गोष्टींन बद्दल मुळीच कळवत नाहीत.
४) समस्ये वर उपाय विचारणे . उपाय सांगितल्यावर त्या उपायाचे शॉर्ट कट विचारणे, आणि शेवटी सगळे सांगून सुद्धा सांगितलेली गोष्ट न करता रडत राऊतपणा चालू ठेवणे.
५) केलेल्या उपायान नंतर आलेली संधी स्वतःचा अहंकारा मुळे , आततायी निर्णयान मुळे , हलगर्जीपणा मुळे , समयसूचकता नसल्या मुळे घालवणे !
६) आपले काय ते शोधून करण्या पेक्षा दुसऱ्याचे काय आहे - नाही बघण्याची उकिरडी हौस असणे. आणि ह्याच अस झालं त्याचं असं झालं , तो नालायक असून पुढे गेला मी शहाणा असून माझे झाले नाही इत्यादी वल्गना करत बसणे.
७) १७६० ठिकाणी जाऊन एकच प्रश्ण विचारणे, ना ना तर्हेचे घोळ घालून ठेवणे. सांगितलेली स्वस्त , सोप्पी स्वतः करण्यासारखी गोष्ट न करणे. कुठले तरी टीव्ही , इंटरनेट वर मिळालेले खर्चिक उपाय करणे. परिणाम मिळत नाहीच . मग हे सगळं बंडल आहे , बोगस आहे असे म्हणणे.
८) आपले टाळके मध्ये घालणे , आणि आम्हालाच जास्ती कळतं असं म्हणत स्वतःचाच पायावर कुर्हाड मारून घेणे.
९) गुण मिलन होत नाही असे सांगून सुद्धा लग्न करणे, महिन्याभरात येऊन आमच पटावं म्हणून काही उपाय आहे का असे विचारणे. 
१०) मूळ मुद्दा सोडून स्वतःचे चरित्र पूराण उगाचच पुन्हा पुन्हा सांगणे.
११) वेळेची कोणतीही बंधनं न पाळता रात्री बेरात्री फोन मेसेज करणे.
१२) सगळं मिळावं , ऐत मिळावं आणि फुकटच मिळाव अशी वेडी अपेक्षा करणे.
सरते शेवटी मुक्ख्य मुद्दा असा कि कोणत्याही क्षेत्रातल्या सगळ्यात टॉप ब्रास लोकं , यशस्वी लोकं जी आहेत त्यांच्यातली जास्तीत जास्ती लोक ह्या गोष्टी फॉलो करतात. आपल्याला हुशारीला आणि कष्टाला शक्तीची जोड देतात. राजकारणी असो , अभिनय क्षेत्रातली असो , मॉडेलिंग करणारी असोत, व्यावसायिक असोत , शेयर ट्रेडर असोत सर्व क्षेत्रातली मंडळी , यशस्वी मंडळी वरील शास्त्रान मध्ये/ कलान मधे विश्वास ठेवतात आणि त्यावर आधारित पावल उचलतात. अगदी अंबानी , मोदी , शहा , मल्ल्या, बच्चन , देवगण पासून सगळे लोक मानतात.
अजून एक गोष्ट. ज्योतिष आणि वास्तू ह्यांचा धर्माशी संबंध नाही ! श्रद्धा आहे का नाही ह्याच्याशी सुद्धा संबंध नाही !
ज्योतिष आणि वास्तू ह्यांचे आपले लॉजिक आहे , technique आहे , नियम आहेत. ते बरोबर समजून परफेक्टली फॉलो केले तर त्यांचे परिणाम निश्चित असतात. कोणत्याही लॉजिकल गोष्टी प्रमाणे ह्या दोन्ही गोष्टी सुद्धा जादुई किंवा चमत्कारी नाहीत. त्यांची निश्चित कार्य प्रणाली आहे ! आणि ती विशिष्ट पद्धतींनी वापरली कि परिणाम १००% येतातच. ज्योतिष आणि वास्तू तुमचा श्रद्धेने नाही तर तुमचा कॉमन सेन्स आणि application प्रमाणे परिणाम देतात ! तुमचा श्रद्धा वगैरे गुंडाळून ठेवल्या तरी चालतील.
दोन्ही वेगवेगळे वाटले तरी तुमचा आयुष्याचे अविभाज्य घटक आहेत आणि त्या मुळे दोन्ही एकत्रित वापरले तर आणि तरच ! १००% परिणाम मिळू शकतात. ज्योतिष हे future फोरकास्टिंग साठी आहे. उपाय सांगणे हा ज्योतिषाचा विषय नाही ! उपाय तंत्रावर आधारित आहेत ! वास्तू हे arrangement आणि designing चे शास्त्र आहे. इथे सुद्धा तंत्र हेच उपाय शास्त्र आहे.
कोणत्याही ग्रहाचा नावातले पहिले अक्षर घेऊन , त्यावर अनुस्वार लावून त्याला बीज मंत्र म्हणणारे वेडे लोक तंत्र कसं समजून घेणार !? ज्यांना तंत्र म्हणलं कि लिंबू मिरची , कवट्या आठवतात ते लोक तंत्र काय समजणार ! तंत्र म्हणजे technique , पद्धत , application ! इतका सोपा अर्थ आहे. तुमचा रोजचा आयुष्यातील सवयिंची, कामांची, विचारांची कार्यप्रणाली तंत्रानुसार थोडी थोडी बदलली तरी सुद्धा अनेक उपाय होतात. त्या ऐवजी लोकांना कुतुहला पोटी कुठलेतरी विचित्र टोटकेच करावेसे वाटतात. त्याला कोण काय करणार.
कोणत्याही लॉजिकल विज्ञान अथवा कले प्रमाणे इथे सुद्धा वापरणाऱ्या माणसाला R & D आणि practice हि करावीच लागते. आणि त्या नुसार प्रत्त्येक प्रॅक्टिशनरची पद्धत विकसित होते.
त्या मुळे आपल्या गरजा , लिमिटेशन्स वगैरे सर्व आधी नीट लक्षात घ्यावे त्या नुसार अपेक्षा आखाव्यात , मग इतर सर्व क्षेत्रान प्रमाणे योग्य माणूस शोधून काढा आणि मग योग्य ते सल्ले घेऊन त्यांची योग्य पद्धतींनी अम्मल बजावणी करा ! म्हणजे परिणाम १००% पक्का होणारच !
काळजी नसावी
शंतनू जोशी

ज्योतिष मर्म # १४ - शंतनू जोशी - ज्योतिष विद्या हि एक शापित विद्या आहे ?! ...

ज्योतिष मर्म # १४ - शंतनू जोशी
ज्योतिष विद्या हि एक शापित विद्या आहे , आणि ह्या संदर्भात मार्गदर्शन करणाऱ्यांना त्रास होतात. प्रष्ण कर्त्याचे दोष मार्गदर्शकाला जातात. ज्योतिष प्रारब्ध बदलू शकत नाही इत्यादी इत्यादी ! आणि अश्या अनेक गोष्टी लोकं बोलताना (बरळताना) दिसतात.
****
मुळातच ज्योतिष , वास्तू , तंत्र इत्यादी विषय हे भावना प्रधान आणि भाविक लोकांनी अभ्यासू नयेत. कारण भाविक मंडळी प्रत्त्येक गोष्टीचा भावनिक अर्थ लावतात. कारण मुळातच सगळे निकष सुद्धा भावनिक असतात. अनामिक भीती मुळे असली लोकं ज्योतिष आणि वास्तू मार्गदर्शन घेण्याचा किंवा अभ्यास करण्याचा भानगडीत पडतात. त्यातील तत्थ्य आणि लॉजिक समजून घेण्याची त्यांच्यात क्षमता आणि इच्छा दोन्ही नसते. एका पुढे एक भावनिक कुतर्क करून हि मंडळी कायचाकाय कल्पना शक्ती लढवत जातात. आणि अश्या लोकांनीच असंख्य पूजा , शांती , यंत्र , फोटो ह्यांचे अवास्तव आणि अतिरेकी बंड माजवून ठेवलय . भावनिक माणसाला फक्त भावनिक बाजू समजते त्याला कोणत्याच गोष्टीत लॉजिक समजू शकत नाही. म्हणून मग वरील प्रमाणे वल्गना आणि विलाप अशी लोकं करताना दिसतात. ज्याचातले तत्थ्य एवढेच असते कि त्यांना काही उमगले नाही आणि त्याना हवे असलेले निकष फेल झाले.
एखाद्या माणसाचा किंवा देवाचा फोटो किंवा मूर्ती घरातून काढल्याने त्या देवाचा किंवा माणसाचा कोप होतो किंवा काहींतरी अनिष्ट होतं असे वाटणारे हे लोक असतात , त्यांचा बुद्धीची झेप तेवढीच. आपल्या प्रमाणेच मृतात्म्याला किंवा परमेश्वरी शक्तीला भावनांचा उकळ्या आणि १७६० लचांडी असतात असे समजणारे हे लोक असतात. अश्या लोकांना तंत्र , ज्योतिष , वास्तू , अध्यात्म विषयक सूक्ष्म तत्त्व कळणं केवळ अशक्य आहे. ह्या प्रकारची लोकच बऱ्याचदा संसारात किंवा वरील विषयात वाहवत गेलेली आणि एककल्ली झालेली आढळतात. आणि म्हणूनच अशी लोकं स्वतः कायम पीडित राहतात आणि दुसर्यांचा पीडेचे कारण बनतात. भावनेचा आहारी गेलेले ज्योतिष , वास्तुवाले आणि अध्यात्मिक लोक हेच खरे समाज कंटक आहेत ! कारण अश्या लोकां मुळेच चांगल्या लोकांचे, सत्याचे आणि धर्माचे नुकसान होते. भारताचा वर्तमानातील आणि इतिहासातील सर्व समस्यांचे कारण हीच कंटक मंडळी आहेत ! अश्याच लोकान मुळे दुर्जनांचे फावते. अश्या लोकांना आपल्या आयुष्यातून लाथाडून बाहेर काढावे. होय लाथाडून ! कारण हि मंडळी अति चिकट आणि सर्व सत्यानाश होई पर्यंत अकलेत प्रकाश न पडणारी अशी असतात. त्या मुळे वेळीच सावध व्हा आणि अश्या लोकांना अपमानित करून आपल्या आयुष्यातून बाहेर फेकून द्या !
***
ज्योतिष शास्त्र , वास्तू शास्त्र किंवा अध्यात्म , योग इत्यादी सर्व बाबतीत मी देवाचा साक्षीने एकच गोष्ट सांगतो ! साधक व्हा ! भाविक नको !
साधक झाल्या शिवाय तुम्हाला काहीच साधणार नाही. भावनिक होऊन तुम्ही फक्त ह्या संसार भव सागरात गटांगळ्या खाल आणि मग दमून बुडून जाल.
साधक प्रत्त्येक गोष्टीतील तत्थ्य अनुभवतो , पडताळतो आणि मग उपयोगात आणतो. शब्दच्छलात आणि भावनावेशात साधक अडकत नाही. साधकाला तत्त्व , तत्थ्य, अनुभव आणि सत्त्य हेच महत्त्वाचे असतात , इतर निरर्थक निरुपयोगी भावनिक विचारान मधे तो अडकत नाही.
- कोणत्याही क्षेत्रात एक कल्ली न होता संतुलित राहतो तो साधक.
-एक तर इहलोकी नाहीतर परलोकी अशी टोकाची भूमिका घेणारा वेडा माणूस साधक असू शकत नाही.
- इहलोकी आणि परलोकी दोन्हीतील उत्तम ग्रहण करतो तो साधक.
- प्रमाण आणि अनुभव आधारित निकष लावतो आणि अनुभवजन्य उपाय योजना आखतो तो साधक.
- शुभ -अशुभ , सात्त्विक-असात्त्विक, पाप - पुण्य ह्यांचा पुस्तकी परिभाषा आणि परंपरागत वाक्प्रचारांवर विश्वास न ठेवता आपल्या पक्क्या अभ्यासावर जो प्रत्त्येक गोष्ट पारखून घेतो तो साधक.
- धर्म असो अथवा कर्म, काळानुरूप त्यात परिवर्तन करतो पण तत्त्व ओळखून मूळ सिद्धांताला धक्का लागू देत नाही तो साधक.
- कालबाह्य झालेल्या गोष्टींना कवटाळून बसतो तो तर साधक असूच शकत नाही. पण काय आणि किती राखावे तसेच काय आणि किती त्यागावे ह्याचा विवेक ज्याला असतो तो साधक.
- समाजाचा किंवा धार्मिक ठेकेदारांचा दबावा खाली असत्य स्वीकारतो तो साधक नाही !
- अस्तित्त्व आणि survival धोक्यात असून सुद्धा हेकटपणा/आडमुठेपण करतो तो साधक नाही !
-वेळेची गरज ओळखून प्रसंगावधान साधून परिवर्तन करतो आणि तत्त्व राखतो तो साधक !
-आततायीपणा मुळे अविचारी त्याग आणि अविचारामुळे अतिरेकी हव्यास करतो तो साधक नाही !
साधक होणे अवघड असते ! भाविक / भावनिक होणे खूप सोप्पे असते. म्हणून भावनिक मूर्खांचा कायम सुळसुळाट असतो ! आणि साधक मोजकेच असतात ! भाविक आणि भावनिक ह्या मध्ये फरक आहे असे लोक म्हणतात. पण भावनेचा त्याग करून अनुभव जन्य अध्ययन केल्याशिवाय अपेक्षित भाव साधत नाही. आणि तो पर्यंत सगळे सो कॉल्ड भाविक हे भावनिकच असतात !
- शंतनू जोशी
-SHARE THE POST ! BUT ALONG WITH MY NAME ONLY. PLEASE. THANKS !

ज्योतिष मर्म # १३ - ग्रह पात्रतेचा ! - शंतनू जोशी


ज्योतिष शास्त्र म्हणले कि, ज्योतिषी आणि त्याचा कडे येणारी लोकं ह्यांचा मध्ये तीन प्रकारची लोकं असतात. हवशे, नवशे आणि गवसे ! हवशे ज्योतिषी हे खुशाल चेंडू बडबोले लोक असतात ज्यांना धड काही येत नसले तरी सगळ्याच विषयान बद्दल भरपूर रंगवून रंगवून बोलू अथवा लिहू शकतात. नवशे ज्योतिषी हे स्वतः गडबडलेले असतात आणि स्वतःचं काही धड बघता येत नसतं पण दुसऱ्यांना काहीना काही सांगायचं म्हणून सांगत असतात आणि एकीकडे स्वतः पण काहीतरी करून बघत असतात. हे अत्त्यंत पाप भीरु आणि भावनिक असतात आणि ज्योतिषातील टेकनिक आणि लॉजिक न समजता फक्त विश्वासाचा जोरावर स्वतः विविध उपाय आणि उद्योग करून बघतात आणि दुसऱ्यांना पण फक्त विश्वासाचा जोरावर काहीबाही सांगून टाकतात. गवसे ज्योतिषी हे फार अभ्यासू असतात , जिज्ञासू असतात आणि म्हणून ते खूप काळ प्रयोगान मध्ये घालवतात. मग जेंव्हा त्यांना ज्ञान गवसत तेंव्हा खूप मुळाशी शिरल्यामुळे त्यांचा बऱ्याचशा बोगस विधींवर, योगांवर आणि परंपरांवरचा विश्वास उडतो. आणि प्रवासाचा ह्या ठिकाणी पोचल्यावर अनेक जण आपलं ज्ञान आपल्याशीच ठेवतात आणि आपल्यापुरतेच बघून मरून जातात. अशा लोकांना ज्ञान खूप असते पण त्यांना स्वतःचा अश्या insights नसतात. आणि ह्या नंतर क्वचित ह्याचा पुढे उरलेले इतर काही असतात ते त्या पुढे आपली नवीन काहीतरी पद्धत विकसित करून मुळासकट समस्यां वर आघात करतात आणि लोकांना सुद्धा सांगतात. आणि ज्या गोष्टी होऊ शकत नाहीत त्या हि उघड करून सांगतात. थोडक्यात काय तर त्यांचा नुसता अभ्यास होत नाही तर त्यात स्वतःचा insights डेव्हलप होतात आणि म्हणून ते निष्णात होतात. इथे ज्योतिष शास्त्र कसं आहे ह्या पेक्षा ज्योतिषाची 'पात्रता' किती आहे हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो ! पात्रता हि कोणत्याही डिग्र्या घेऊन अथवा कोर्स करून येत नाही. कुठला गुरु किंवा पिशाच्च सुद्धा पात्रता देऊ शकत नाही ! पात्रता हि तुम्हालाच दाखवावी लागते. आणि जेवढी तुमची पात्रता तेवढेच ज्योतिष शास्त्र तुम्हाला गवसते !
आता समस्या घेऊन येणाऱ्या प्रश्न कर्त्यां कडे वळूया. ह्यात सुद्धा वरील तीन प्रकार असतात. हवशे प्रश्नार्थी हे उगाचच कुतुहूल म्हणून फाजील प्रश्न विचारतात. म्हणजे मी जो प्रश्न विचारतोय तो खरा आहे का नाही सांगा, माझे पूर्वज जन्म सांगा, मला स्वप्न पडतात खूप त्याचे मूळ काय सांगा, माझा विवाह झालाय पण तरी मला बाहेर इतर कोणाशी संबंध झाले तर हौस आहे असे काही होऊ शकत का ? झाले तर ते कोणाला न करता यशस्वी होईल का ? इथे पर्यंत सुद्धा कायचाकाय ! सदरात मोडणारे प्रश्ण विचारू शकतात. मला एक दोन बायकांनी मी आत्मा हत्त्या करू का ? केली तर आत्मा हत्त्या यशस्वी होईल का ? कशी करू ? असे सुद्धा टोकाचे प्रश्ण विचारलेले आहेत. हि एक पत्रिका आहे ती पुरुषाची का स्त्रीची हे सांगा ! किंवा मला सचिन तेंडुलकर पुढचा बॉल ला सिक्स मारेल का हे सांगा. अश्या प्रकारचे काहीही म्हणजे अगदी काहीही प्रश्न लोकं विचारतात. माझ्या कडे एकांनी मी नवीन गाडी घेतली तर त्यावर मांजर बसून ओरखडे करेल का नाही हे सांगा असे सुद्धा विचारले आहे ! आणि गम्मत म्हणून मी सुद्धा त्यांना काय होईल ते सांगितले आणि आश्चर्य म्हणजे ते खरे हि आले. तर अश्या हौश्या प्रश्नांना सुद्धा ज्योतिषात उत्तर आहेत ! अगदी ठोक उत्तरं आहेत. पण ते माणसाचा अभ्यासावर अवलंबून आहे. आणि दर वेळी अश्या उचलली जीभ आणि ..... ह्या सदरात मोडणाऱ्या प्रश्नांना उत्तर देता येईलच असे नाही. कारण पुढे सांगतो.
नवशे लोक हे उगाचच त्यांना एखादे रत्न किंवा पूजा करायची हुक्की आली, किंवा उगाचच भीती वाटत असेल, तर ज्योतिषांनी काही तरी भन्नाट सांगाव. आणि आपण मग त्या हिशोबानी काहीतरी तसेच भन्नाट करावं अश्या हिशोबानी येतात. मग अशांना तसेच ज्योतिषी भेटल्यास सुतावरून स्वर्ग गाठायला वेळ लागत नाही. अंगावरचा एखाद्या चामखिळीचा अर्थ," गेल्या जन्मी बैल गाडीतून तुम्ही जात होतात तेंव्हा तुम्ही चुकून एका नागाला चिरडले, म्हणून आता तुम्हाला सर्प दोष आहे ! " असे भन्नाट निष्कर्ष निघू शकतात. किंवा काहीच समस्या नसताना उगाचच माणसं येऊन मला उदास वाटते , शांती वाटत नाही आणि तत्सम गोष्टी सांगतात, किंवा काम करावेसे वाटते पण होतच नाही माझ्या कडून असे म्हणणारे मुलखाचे आळशी लोकही येतात. त्याच्यावर हमखास तुमचावर करणी केलीये कोणीतरी हे कारण दिले जाते. म्हणजे अश्या लोकांची संख्या इतकी आहे कि अक्ख शहर बहुधा घरी बसून एकमेकांवर कर्णिच करत असाव. अशी लोकं मिळेल त्या ज्योतिषी, हसत सामुद्रिक , तांत्रिक बाबा, नाथ बाबा अश्या साग्ग्ळ्यांना भेटून येतात, सगळे उद्योग करतात , मग प्रत्त्येक नवीन माणसाला आधीचा माणसाची किमया काय होती हे सांगतात ! आणि त्या मुळे अश्या लोकांना व्यवहार ज्ञान कमी असते, अर्ध्या समस्यांचे कारण तेच असतात, सगळ्या करण्या त्यांनीच स्वतःवर केलेल्या असतात ! आणि वचने किम दरिद्रता ! त्या मुळे अखंड अश्याच कुठल्यातरी विषयावर किंवा आपल्या काल्पनिक समस्यां वर बोलून बोलून सुद्धा त्यांचा कंठ सुकत नाही. बर एखाद्या खऱ्या समस्येवर कोणी काही उपाय सांगावा तर तो न करता त्या बद्दल शंका , कुशंका आणि लघु.... करण्यात कितीतरी वेळ घालवतात ! मग करतात त्यात १७६० वेळा चुकतात आणि मग मधेच हातचं सोडून पळत्याच्या पाठी लागतात त्या मुळे आयुष्याची गोळा बेरीज होती तिथेच राहते ! असे लोक spiritual टुरिस्ट होतात, इकडून तिकडे भरकटत राहणे हा त्यांचा स्थायी भाव असतो. आणि घरचांचा आणि बाहेरचांचा सगळ्यांचा लेखी ते एक मस्करीचा विषय बनतात.
गवसे लोक आहे ती समस्या नीट मोजक्या शब्दात सांगतात आणि सांगितलेली गोष्ट मुकाट्याने करतात , चांगले झाले तर आवर्जून सांगायला येतात, नाही झाले तर प्रामाणिक पणे पुन्हा एकदा विचारून सुधारणा करतात, तरीही काही नाही तर अजून कोणाचा विचार करतात किंवा गप आपले आहे त्यात समाधान मानतात आणि आयुष्यात बाकी व्यवस्थित असतात. न स्वतःचा डोक्याला शॉट ! न ज्योतिषाचा !
इथे सुद्धा मुक्ख्य मुद्दा पात्रता ! हाच आहे. पात्रता नसेल तर माणसाला आपलीच समस्या ना धड समजते ना धड सांगता येते ना धड सोडवता येते.
आता वळूया पत्रिकेतील योग ! इथे सुद्धा पात्रता कशी लागू होते हे पाहूया. एखाद्या माणसाची जी मूळ पात्रता आहे आणि त्याला बाहेरून मिळणारी मदत किती आहे- उदाहरणार्थ पैतृक संपत्ती/मदत , हुंड्या मध्ये मिळालेली संपत्ती/मदत , लॉटरी किंवा तत्सम मार्गातून मिळालेली संपत्ती/मदत. हे फार महत्त्वाचे आहे. हे दोन्ही कळले कि मग त्याचे पत्रिकेतील योग किती प्रमाणात साकार होतील ह्याचा अंदाज येतो. गमतीची गोष्ट अशी असते कि एखाद्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला, सैनिकाला आणि साध्या watchman ला कधी कधी अगदी एकसारखेच योग असतात ! पण त्याची मूळ पात्रता आणि त्याला मिळालेली सपोर्टिव्ह पात्रता किती (म्हणजे आर्थिक, तसेच वशिला, घूस ह्या मार्गानी येणारी पात्रता ) हे लक्षात घेतले कि मग कळते कि हा माणूस साधारण किती मजल मारेल. पत्रिकेतील माझा जो काही अभ्यास आहे(थोडाफार) त्या वरून पात्रता कोशण्ट/ फॅक्टर आणि सपोर्टिव्ह पात्रता कोशण्ट/ फॅक्टर असे दोन प्रकार मी चक्क टक्केवारी सहित काढतो आणि मग पुढील योग इत्यादी पाहतो. ह्यावरून एखाद्याचा उत्कर्ष आणि डाऊनफॉल किती उच्च आणि किती फुसका असेल हे बघता येते.
मेहेनत करणाऱ्या प्रत्येकालाच यश मिळते असे नाही आणि प्रत्त्येक आळशी माणसाला अपयश येते असेही नाही. त्या मुळे त्या माणसाची नैसर्गिक पात्रता आपल्याला काढता आलीच पाहिजे. मग हे सांगता येईल कि त्याला साधारण किती परिश्रम करावे लागतील आणि तसेच किती जुगाड ! करावे लागतील  ! अर्थात पात्रता आपल्या हातात आहेच आणि आपण ती वाढवू शकतोच ! पण ती मुळात किती उपलब्ध आहे आणि मग आता त्यावर किती आपण उभी करायची आहे हे कळले तर आणि तरच आपल्या नशिबात आपल्याला प्राण फुंकता येतात ! नाहीतर नाही ! तर थोडक्यात काय कि पात्रते विना सगळे फोल आहे आणि पात्रते मुळे ... कुछ भी हो सकता है ! त्या मुळे पात्रतेचा हा ग्रह बलवान केलाच पाहिजे 
काळजी नसावी !
शंतनू जोशी

ज्योतिष मर्म # १२ - वास्तू , ज्योतिष , मिस्टिसिझम आणि त्याचा नाना पद्धती . - शंतनू जोशी


मध्यंतरी कोणीतरी असे जोक टाकत होतं, कि दारूचा दुकानाला आणि बार ला वास्तुशास्त्र लागू होत नाही का ? कुठेही आणि कोणत्याही दिशेला चालतं.
.
.
गम्मत अशी कि त्या नंतर एक वर्षभरात माझ्या कडे १०-१२ लोक बार , दारूचे दुकान , पब इत्यादी साठी वास्तू विचारायला आले होते . ह्या लोकान कडे पैसा असतो पण तितकीच लचांडी आणि लफडी सुद्धा असतात हे अशावेळी कळते. आणि काही लफडी हि खूप विकोपाला जाऊन एक तर रस्त्यावर येण्याची वेळ येते किंवा कधी गुंडान कडून मार खावा लागतो , तर कधी त्यांचा भितीनी जीव द्यावा लागतो . तसेच बिल्डर आणि राजकारणी मंडळींना ज्योतिष वास्तू लागू होत नाही का ? असे हि अनेक जण विचारत होते . आणि आश्चर्य म्हणजे काही महिन्यातच माझ्या कडे राजकारणी , बिल्डर अशी मंडळी सुद्धा येऊन गेली. मोट्ठी गाडी , अंगावर सोन , राहायला बंगला ! पण घरचान समोर थोडं जुजबी बोलणं झाल्यावर प्रत्येकानी हळूच इशारा करून आपण दुसरी कडे जाऊन बोलू असे सांगितले . आणि मग कोणी बंगल्याचा छतावर तर कोणी ऑफिस मध्ये दरवाजे बंद करून, आपल्या खऱ्या समस्या सांगितल्या. लांबून इतरांना वाटते तितके ह्या लोकांचे आयुष्य चांगले नसते. हि लोकं चंगळ करत सुखात असतात आणि काहीच त्रास नसतो हा अजून एक गैर समज. ह्या क्षेत्रान मध्ये जितकी प्रतिष्ठा तितकीच बदनामी , जितके मित्र तेवढेच शत्रू , जितकी कमाई तेवढेच खर्च आणि जितक्या सुख सोइ तितक्याच समस्या !
.
.
सांगण्याचा हेतू एवढाच कि शास्त्र हे सर्वांना लागू होते. परिस्थिती आणि प्रोफेशन प्रमाणे त्याला वेगळे पैलू येतात. प्रत्येकाला समस्या असतात आणि त्या वर समाधान सुद्धा असते . आणि सामान्य मध्यम वर्गीय लोकांनी उगाचच असे समज करून घेतलेले असतात कि हि मंडळी सुखात आहेत , किंवा हि लोकं असलं काही पाळत नाहीत तरी त्यांची प्रगती होते. आम्ही आपले सगळे करत बसतो आणि काहीच हाती लागत नाही. खरेतर असे म्हणणाऱ्यांना त्या सो कॉल्ड चुकीचा गोष्टी करण्यात गुप्त रस असतो आणि वरील लोकान बद्दल ईर्ष्या आणि मत्सर सुद्धा असतो. आणि खूप सारे अज्ञान सुद्धा असते. म्हणूनच त्यांना फळ मिळत नाही. ज्या लोकांना लोकं वाईट समजतात बऱ्याचदा अशी मंडळी उपाय इत्यादी सांगितल्यावर अगदी न चुकता कोणत्याही परिस्थितीत सातत्त्याने ते पूर्ण करतात. आणि सो कॉल्ड चांगले लोक हे अजिबात सातत्य नसलेले , कमकुवत मनाचे आणि शंकेखोर असतात. ह्यातून असे कळते कि बाहेरून जसे दिसते तसे सर्व नसते.
.
.
मी एकदा ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन माणसाचा घरी सुद्धा वास्तू बघायला गेलेलो, त्यांचा कडे सुद्धा येशू ख्रिस्ताचा फोटो कुठे असावा , कुठल्यादिशेला दिवे लावावेत , ऑर्थोडॉक्स चर्च चे इतर संस्थापक इत्यादींचा फोटो कुठे लावावेत असे नियम फादर सांगून गेला आणि ते नियम ते पाळत होते. मग मला त्यांचा देवता , चिंन्ह आणि चर्च वास्तुकलेचा इतिहास असा अभ्यास करून त्या अनुसार त्यांना वास्तू संबंधी बदल सांगावे लागले. आश्चर्य असे कि जुन्या चर्च मध्ये सुद्धा वास्तू नुसार आल्टर कुठल्या दिशेचा विशिष्ट अँगल ला क्रॉस बसवायचा , कोणत्या आकारात मिनार बनवावेत , काचा कुठल्या रंगांनी रंगवाव्यात ह्या बद्दल माहिती मिळते . अमेरिकन सरकारी बिल्डींग्स मध्ये सुद्धा तिकडचा ज्योतिष अल्मानॅक प्रमाणे विशिष्ट तारखा बघून बांधकाम सुरूकरण्यात आलेले होते हे हि आढळते. वास्तू नुसार अनेक गोष्टी त्यांचा त्या इमारतींन मध्ये बरोबर आहेत. जु धर्मा मध्ये अग्रेसर असलेली जमात म्हणजे आशकेनाझीं जु हे सुद्धा मूळचे अशकेनाझी ट्राईब चे आहेत आणि इथूनच त्यांचा मध्ये सुद्धा कबाला नावाचा प्रकार आहे ज्यात अंकशास्त्र, शरीरातील चक्र , पंचतत्त्व आणि तत्सम कंसेप्ट्स आहेत. आजही अनेक जू ह्या गोष्टींचे पालन करतात आणि विश्वात जु लोक हे व्यापारात आणि बँकिंग सिस्टिम मध्ये त्यांनी प्रस्थापित केलेल्या जबरदस्त कंट्रोल आणि यशासाठी जाणले जातात.
.
.
.
वहाबी इस्लाम मता नुसार मूर्ती , दर्गा आणि यंत्र , तावीज इत्यादी हराम आहे. पण इस्लामचा इतर जमातीं मध्ये 'नक्षे सुलेमानी' , पाणी मंत्रवणे, ठराविक कामान साठी कुराण मधील ठराविक आयात म्हणणे इत्यादी प्रकार आहेत. मुसलमान लोकं मशिदीत जकात देतात, मौलवी आणि फकीर मंडळी ज्या गोष्टी त्या लोकांना देतात त्यात वशीकरण , शत्रू स्तंभन , विद्वेषण असे प्रयोग रूढ आहेत. माझ्या कडे आलेल्या काही मुसलमान लोकांना मी ह्या प्रमाणे सुद्धा काही गोष्टी सुचवल्या होत्या.
.
.
जैन आणि बौद्ध लोकान मद्धे सुद्धा यंत्र , मंत्र आणि तंत्र मार्गानी केलेल्या क्रिया प्रचलित आहेत आणि आजही वापरल्या जातात. अनेक जैन घरान मध्ये मूर्ती नसतील पण यंत्र नक्की असतील, दुकानात किंवा ऑफिस मध्ये 'अर्हम कलश' नक्की असेल , किंवा बीसा यंत्र इत्यादी प्रकार असतील.
.
थोडक्यात काय तर तत्त्व तेच पण प्रत्त्येक पंथांनी आपल्या मतां नुसार ती तत्त्व वापरली. आणि बऱ्याच प्रमाणात त्यांना त्या गोष्टींचा लाभ झालेला सुद्धा आढळतो. हिंदू धर्म हा वेदां पासून सुरु झाला पण पुढे तंत्र , यंत्र आणि मंत्र मार्ग विकसित केले गेले . कलियुगात यंत्र पूजन श्रेष्ठ असे काही ठिकाणी लिहिलेले आढळते. पण हिंदू धर्मीय भक्ती पंथा मध्ये जास्ती असल्या कारणानी, आणि बऱ्याच प्रमाणात व्यक्ती पूजेत रमल्यामुळे त्यांना ह्या सर्व गोष्टीचे भय आणि शिसारी असते. पण ह्या मुळे ते स्वतःच अनेक फायद्यांना मुकतात . भागवत आणि इतर ग्रंथा मधून पूर्वी हिंदू धर्मच सगळ्या जगात होता असे वाटते. अगदी हिंदू नाही तर तत्सम धर्म जगात असावा असे वरील उदाहरणं बघून वाटते. आजचा काळात हिंदू स्वतः मूळ मार्गावरून पथभ्रष्ट झाले आहेत , मात्र इतर लोक त्या हिंदू प्रेषित संकल्पनांना पाळताना दिसतात. आणि त्या मुळे विश्वात शक्ती, विस्तार आणि आर्थिक दृष्ट्या इतर पंथ जास्ती शक्तिशाली आणि बलाढ्य दिसतात. त्यांचा उत्कर्षाचे आणि हिंदूंचा पतनाचे खरे जबाबदार हिंदूच जास्ती आहेत ते नव्हेत ! हिंदूंनी वैचारिक , प्रापंचिक , पारमार्थिक आणि व्यावहारिक सर्व स्तरांवर आमूलाग्र बदल करायला हवे तरच ते पुनश्च यशाचा शिखरावर आरूढ होतील. आणि ह्या सर्वांसाठी लागणारे सामर्थ्य आणि पात्रता हि उपासना आणि शक्ति साधनेतून येते . तंत्र , वास्तू आणि ज्योतिष हे शक्ती चा मॅनिप्युलेशनचे राजमार्ग आहेत.
.
.
सत्कर्म आणि सुविचार असणे आवश्यक असतेच पण सत शक्ती, विशिष्ट ऊर्जा बरोबर असल्यास त्याच कृतीचे फळ कयिक पटीने वाढवता येते. हे सर्व प्रकार केवळ प्रापंचिक नसून पारमार्थिक लाभासाठी सुद्धा असतात. आणि त्या मुळे मनुष्याचा शारीरिक , मानसिक आणि शक्ती स्तरावर अफाट बदल होऊन त्याला आपल्या आयुष्याला निश्चित दिशा देता येते . तंत्र , मंत्र , यंत्र आणि वास्तू- ज्योतीष इत्यादीन मध्ये कोणत्याही प्रकारचे हेवे दावे , जात-पात किंवा गरीब श्रीमंत हे भेद नसतात . गरिबातल्या गरीब माणसाला सुद्धा ह्या मार्गांनी निश्चित लाभ करून घेता येतो , आणि हो अगदी शून्य रुपये खर्च करून सुद्धा ! अगदी श्रद्धा नसली तरी चालेल ! कारण ह्या गोष्टी आणि शास्त्र हे सिस्टिम नि , टेकनिक नि चालते ! तुमचा विश्वासावर नाही. इथे तुमचा विश्वासाला काही किंमत नाही तुमचा अँप्रोच , अपेक्षा बरोबर असतील आणि तुम्ही सातत्त्याने न चुकता पर्फेक्शननि उपाय केले तर निश्चित फळ मिळते !
काळजी नसावी
शंतनू जोशी

ज्योतिष मर्म #११ - दिवाळी , उत्सव प्रकाशाचा, उत्सव स्वच्छतेचा ! - शंतनू जोशी


सामान्यतः दिवाळ सण हा प्रकाशाचा उत्सव समजला जातो , तसेच लक्ष्मीचा , संपत्तीचा उत्सव सुद्धा मानला जातो. दिव्याची रोषणाई , मिठाई , फटाके इत्यादी नेहेमीच दिवाळी विषयक आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरतात ! पण दिवाळी म्हणजे एवढेच आहे , का अजून काही ? आपल्या कडे एक खूप मोठ्ठा गैर समज असा आहे कि दिवाळी हा एक शुभ तिथींनी युक्त सण आहे. माझ्या अभ्यास आणि अनुभवानुसार असे नसून गणपती पासून दिवाळी पर्यंत उतरत्या क्रमाने तिथी तीव्र आणि अशुभ , नकारात्मक होत जातात. अनेकांचे पैसे अडकतात, उसने पैसे घ्यायची वेळ येते आणि एकूणच थोडे ओढाताण होण्याचे योग असतात. त्या मुळेच खरं तर गणपती , पितृ पक्ष (सण नाही पण उपासना , दोष निवृत्ती , कर्तव्य पूर्ती ज्यानी खूप फायदे होतात, नवरात्री , दसरा मग दिवाळी हे सण आपल्या हिंदू धर्मात साजरे केले जातात. जेणे करून लोकं सणांची मजा घेत सतत उपासनेत राहावीत आणि जेणे करून ह्या काळात होणारे त्रास कमी होतील.
दिवाळीला अत्त्यंत महत्त्व प्राप्त करून देणारा दिवस म्हणजे लक्ष्मी पूजन. ह्या दिवशी व्यापारी लोकान साठी पर्वणी असते , कारण ह्या दिवशी त्यांचे आद्य दैवत म्हणजेच माता लक्ष्मी ह्यांची पूजा अर्चना केली जाते ! आणि वर्षभर धंदा व्यवसाय भरघोस होत राहावा ह्या साठी प्रार्थना केली जाते. तसेच देव लोकातला ट्रेजरर , चार्टर्ड अकाउंटंट उर्फ इन्व्हेस्टमेंट गुरु म्हणजेच कुबेर भगवान ह्यांची सुद्धा आराधना केली जाते कारण गुंतवणूक केलेल्या पैश्यातून लाभ घेण्यासाठी भगवान कुबेर अत्त्यंत महत्त्वाचे आहेत. माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर ह्यांची षोडषोपचारानी पूजा करणे तर चांगले असतेच , पण विशेष मुहूर्तां वर करणे अजून चांगले. घरी पूजा करताना काही वेगळे नियम पाळावेत आणि दुकानात, ऑफिस मध्ये पूजा करताना काही वेगळे नियम पाळावेत , असे केल्यानी दोन्ही ठिकाणी यथा इच्छित फळ प्राप्त होते. अनेकदा गुरुजींचा वेळे नुसार किंवा घरचांचा पूजे साठी असलेला कंटाळा बघून लोक सामान्य मुहूर्तावर पूजा करून मोकळे होत असतात आणि मग मंडळी फराळ आणि फटाक्यांचा आनंद घेण्यास सज्ज होतात. पण आपणास ह्या उपचारांचा नेमकेपणानी लाभ घ्यायचा असल्यास काही छोट्या छोट्या पण महत्त्वपूर्ण गोष्टी पाळण आवश्यक आहे.
घरातील लक्ष्मी पूजनासाठी बसलेल्या लक्ष्मी प्रतिमेचा प्रयोग करावा कारण घरात लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला ही उपासना करायची आहे. ह्या प्रतिमेत कोणत्याही प्रकारे तडा गेलेला नसावा, तसेच ह्या मूर्तीचा उजव्या पायाचे पाऊल दिसणे अत्त्यंत आवश्यक आहे. मूर्ती , प्रतिमा सुस्वरूप आणि स्वच्छ करून वापरावी. घरी लक्ष्मी स्थिर होण्यासाठी विशेष मुहूर्त कोणा माहितगारास विचारून त्या मुहूर्तावरच हे पूजन करावे. ह्यावेळी घरात तेलाचे अथवा मेणाचे दिवे ना लावता शुद्ध तुपाचे दिवे लावावेत. एक वेळ कमी प्रमाणात दिवे लावले तरी चालेल पण तुपाचेच दिवे प्रयोगात आणावेत. ह्या पूजेत भगवान कुबेर ह्यांना यंत्र रूपात पुजावे आणि जमल्यास घरी श्री यंत्र ह्या दिवशी स्थापन करावे. आधी पासून असल्यास त्या वर अभिषेक उपचार करावे. सर्व पूजा झाल्या नंतर घरातील कुमारिका , सुहासिनी इत्यादींना पाया पडून नमस्कार करावा !
व्यवसाय ठिकाणी माता लक्ष्मीची प्रतिमा हि उभी असलेली असावी, प्रसन्न मुद्रा असणारी प्रतिमा वापरावी. ह्या पूजेचा मुहूर्त हा लक्ष्मी खेळती राहावी ह्या हिशोबानी काढला जातो , तो माहिती करून घ्यावा आणि त्या वेळीच कार्यालयातील पूजा संपन्न करावी . ह्या प्रतिमेत माता लक्ष्मीची दोन्ही पावले व्यवस्थित दिसायला हवी. इथे श्री कुबेर ह्यांची मानव स्वरूपातिल प्रतिमा स्थापन करावी. आणि हिशेबांचा वह्यासमोर ठेवून हि पूजा पार पाडावी.
उपचार पूजा इत्यादी संदर्भात असे अनेक बारीक बारीक सल्ले देता येऊ शकतात तसेच पत्रिकेनुसार प्रत्त्येक माणसाला सर्वात शीघ्र परिणाम मिळवून देणाऱ्या गोष्टी सांगता येऊ शकतात. ज्यात विशिष्ट मंत्र , श्लोक इत्यादींचा समावेश असतो. कधी काही विशेष रत्नांचा प्रयोग करून ह्या शुभ परिणामांना द्विगुणित करता येते. तसेच काही यंत्र आणि विशेष पूजा मांडणी च्या पद्धतीन द्वारे समस्या सोडवता येतात.
वरील सर्व गोष्टी थोड्याफार फरकाने सर्वांना माहिती असतात पण पुढील सर्वात सोप्पी आणि सर्वात दुर्लक्षित गोष्ट खूप शीघ्र तुम्हाला अत्त्यंत चांगले परिणाम देऊ शकते. दिवाळी हा फक्त प्रकाशाचा सण नाही तर त्या हून जास्ती स्वचछतेचा आहे ! म्हणूनच आपल्याकडे केरसुणी किंवा झाडूला माता लक्ष्मी चे स्वरूप मानतात . चुकून पाय लागला तर केरसुणीला नमस्कार करतात. कारण स्वचछता हे माता लक्ष्मी आकर्षित करण्याचे सर्वात शक्तिशाली माध्यम आहे. जिथे स्वच्छता असते तिथे पैसे चुंबक लावून ओढल्या प्रमाणे , नव्हे ! vacuum cleaner नि ओढल्या प्रमाणे आकर्षित होतो! आज दुनियेतील अनेक देशात भारता एवढे धर्म शास्त्र नसून सुद्धा प्रचंड आर्थिक प्रगती झालेली आहे , त्या साठीचे सर्वात भक्कम कारण म्हणजे स्वच्छता हे आहे ! भारता मध्ये लोकांनी आतल्या , मनाचा स्वच्छतेला खूप महत्त्व दिले ! पण बाह्य स्वच्छता दुर्लक्षित होत गेली ! आणि त्या मुळे अनेकदा भारताला आणि भारतीय लोकांना आर्थिक समस्यांचा , गरिबीचा , कर्जबाजारी अवस्थेचा सामना करावा लागतो.
ह्या दिवाळीत मी तुम्हाला सांगतो कि आपले घर , कार्यालय , दुकान स्वच्छ करा. आणि नुसत्या कोरड्या स्वच्छतेनी काम होणार नाही ! तर ओल्या फडक्यांनी हि स्वच्छता झाली पाहिजे. धूळ पूर्णपणे हद्दपार झाली पाहिजे ! घरातील अडगळी ला घरा बाहेर फेकून द्या ! निरुपयोगी वस्तू ह्या तुमचा वास्तूला तसेच पत्रिकेतील पाप ग्रहांचा नकारात्मक ऊर्जांना वाढवायला खूप मदत करतात ! त्या मुळे जुन्या निरुपयोगी वस्तू गरजूंना द्या किंवा योग्य पद्धतीने फेकून द्या. वापरात नसलेल्या वस्तू विकून टाका. गंजलेल्या गोष्टी, जुन्या गाद्या - उशा, भिजलेली खराब झालेली लाकडं , प्लायवुड , जुने गंजके खिळे , पिना , बंद घड्याळं इत्यादी अनेक वस्तू घरा मध्ये आणि घरा भोवती पडून असतात आणि नकळत ह्या वस्तू तुम्हाला अनेक प्रकारे नुकसान देतात. अजून एक कचरा साठण्याची मुख्य जागा म्हणजे घरान मधले लोफ्ट्स आणि ओव्हरहेड स्टोरेज ! हे स्वच्छ करा !
माझ्या कडे येणाऱ्या ज्योतिष वास्तू विषयक सल्ला मागणाऱ्या लोकांना , अडकलेल्या पैश्यांना मिळवून देण्यासाठी, नवीन आर्थिक संधी मिळण्यासाठी , आर्थिक उन्नती साठी वरील स्वच्छतेचा उपाय मी सांगतो ! आणि त्यातल्या अनेकांना ते केल्यावर २-३ दिवसात किंवा आठवड्या भरातच अडकलेले पैसे मिळणे , अनेक वर्ष पडून राहिलेलिया शेयर्स चे पैसे मिळणें इत्यादी अनुभव आलेले त्यांनी मला कळवले. त्या मुळे आर्थिक समस्यां वर मुळापासून स्वच्छता हा एक अमोघ आणि अचूक टोटका आहे ! असे समजावे ! तसेच लक्ष्मी पूजना दिवशी लक्ष्मी प्रसन्न करण्याचे सर्वात जलद माध्यम सुद्धा आहे !
आपल्या सर्वांना काही दिवसात येणाऱ्या स्वच्छ आणि प्रकाशमयी दिवाळी साठी माझ्या सदिच्छा ! आणि काही आर्थिक अडचणी आपण सापडले असल्यास दिवाळी पर्यंत आपल्याला वरील उपाय करता यावेत म्हणून हा लेख लवकर टाकत आहे . तरी ह्याचा लाभ घ्यावा आणि समस्यां मधून मुक्त व्हावे.
काळजी नसावी
शंतनू जोशी