Monday, July 22, 2019

'अध्यात्म - गुरु - अनुभूती' - सत्य असत्य - शंतनू जोशी

सध्या सोशल मीडियाचा माध्यमातून अनेक विषय लोक उघड करून फेसबुक वर टाकतात. त्यामुळे सगळेच विषय मोकळ्यावर सगळ्यान समक्ष येतात. इतर विषयान प्रमाणे अध्यात्मिक विषयांवर सुद्धा खूप लिहिले बोलले जाते . हे सोशल मीडिया वर टाकावे का नाही हा वेगळा मुद्दा आहे. पण त्यातून काही विषय समजुती ह्या कशा चुकीचा झाल्या आहेत, भरकटल्या आहेत आणि त्या मुळे किती मानसिक , आत्मिक नुकसान माणूस करून घेतो हे हि दिसते .
तर अश्या अनेक विषयान पैकी एक म्हणजे संत आणि संतानुभव, आणि त्या मधून लोकांना आलेल्या अनुभूती इत्यादी. सध्या बहुत करून लोक देव सोडून गुरुं वर जास्ती भर देतात. आणि त्या गुरु भक्तीत ते आकंठ बुडालेले असतात. सर्व काही विसरून गुरु भक्ती आणि गुरु मय झालेले असतात .
तर गुरु भक्ती किंवा संत भक्ती ह्यावर माझा शून्य आक्षेप आहे . ज्याची त्याची श्रद्धा .
पण त्याच वेळी काही मुद्द्यांवर वैचारिक clarity फार महत्वाची असते आणि खूप मोट्ठ्या प्रमाणात हरवलेली दिसते म्हणून पुढील काही मुद्दे मांडतो. ह्यात काही चुकीचे समज आणि त्या मागील लोकांची कारण मीमांसा ह्या बद्दल मी बोलणार आहे.
गैर समज
नम्बर १) संतान शिवाय किंवा गुरूंशिवाय आपल्याला अध्यात्मिक प्रगती, अनुभव आणि मोक्ष मिळू शकत नाही.
उत्तर - ८४ लक्ष योनी फिरून मग एकदा मनुष्य जन्म मिळतो असे म्हणतात आणि मनुष्य जन्म हा एकमेव असा जन्म आहे ज्याच्यात मनुष्य अध्यात्मिक प्रगती करून घेऊ शकतो आणि नराचा नारायण बनवू शकतो ! विचार करा !!! नराचा नारायण होऊ शकतो ! म्हणजे एवढी क्षमता आहे ह्या मनुष्य जन्मात. त्या मुळे कोणीतरी तुम्हाला मार्गदर्शन केले नाही ,किंवा कोणी गुरु नसतील, तर तुम्हाला ते अनुभव/ ती प्रगती प्राप्तच होऊ शकत नाही, हे १००% अशक्य आहे. मुळात मनुष्य अहं ब्रह्मास्मि आणि तत् त्वं असी चा अनुभव घ्यायला आला आहे आणि जो परमेश्वर तुमच्या आत आहे त्याला तुम्ही स्वतः experience करू शकत नाही ?! हे शक्यच नाही.
उलट पक्षी तुमचा शिवाय दुसरा कोणीही माईचा लाल तुम्हाला ते अनुभव देऊ शकत नाही. तसेच तुम्हाला तुमचा इच्छे विरुद्ध वंचित सुद्धा ठेवू शकत नाही . दर्शन आणि स्वप्न इत्यादी अनुभूती ह्या संकेत असू शकतात. पण त्या गोष्टी परम अनुभव नव्हेत. परम अनुभव तुम्हाला फक्त एकाच माणूस देऊ शकतो. तुम्ही स्वतः.
२) गुरुं मध्ये आणि देवा मध्ये फरक नसतो. ते एकच असतात.
उत्तर - हेच तर सगळ्यात मोट्ठे असत्य आहे. गुरुं मध्ये परमेश्वर आहे निश्चित पण तो तेवढाच जेवढा समस्त मनुष्य , प्राणी आणि वृक्ष मात्रात आहे. संतान मध्ये आपल्या पेक्षा जरा जास्तीच देव भरलाय असे होऊ शकत नाही. आणि ते एकच असते तर संतांनी देवाची भक्ती , ध्यान, साधना केले नसते आणि त्या निगडित स्तोत्र, मंत्र आणि तंत्र अभ्यासले आणि रचले नसते. संतांनी स्वतः भगवत भक्तीच जास्ती केलेली आहे. मुळात गुरु म्हणजे तुमचा अंधकार मिटवणार माध्यम आहे. पण म्हणजे माध्यम हेच साध्य होत नाही. साध्य केवळ परमेश्वर. गुरुं मध्ये प्रकट होणारी दैवी शक्ती हि तुम्हाला ते गुरु / संत म्हणजेच देव आहेत असे दाखवण्या साठी नसून . हि महाशक्ती तुमच्यात सुद्धा आहे आणि जसे त्यांनी सामान्य मनुष्य असून सुद्धा ती शक्ती जागृत केली , उत्क्रांत केली तशीच ती तुम्हीही करू शकता हे दाखवून देण्या साठी आहे. ते समजायचे सोडून त्याच माणसाचे पाय धरून तोच देव आहे असे म्हणणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी असे आहे . मग त्यांनी दिलेल्या अनुभूती, शिकवण वाया गेले असा अर्थ होतो . त्या मुळे गुरूंचा आदर करावा पण परमेश्वर पहिले हे लक्षात ठेवावे.
३) आपलं एवढ नशीब नाही कि देव आपल्याला दिसेल किंवा बोलेल.
उत्तर - संतांना दिसू शकतो , त्यांच्याशी बोलू शकतो तर तो तुमच्याशी सुद्धा बोलू शकतो. जो देव तुमचा आत आहे तुमचाशी बोलू शकत नाही ?! हे अशक्य आहे. आणि मुळात देव दिसणे आणि देव बोलणे ह्या संकल्पनांचा पलीकडे गेले पाहिजे. देव हि शक्ती आहे माणूस नाही. त्याम उले देवाचा अनुभव येऊ शकतो. तो दिसेलच किंवा बोललच असे नाही. आणि दिसण्या बोलण्याची गरज आहे असे हि नाही. जो अनुभव देव देऊ शकतो तो कोणीच देऊ शकत नाही. आणि देव कोणती गोष्ट करू शकत नाही असे हि असू शकत नाही. पंगुम लंघयते गिरीम , मुकं वाचालं करोति ! पांगळ्याला चालवणारा आणि आंधळ्यांना दृष्टी देऊ शकणार , मुक्याला वाचस्पती बनवणारा परमेश्वर काहीही करू शकतो. तुम कितने यकीन और शिद्दत से कोशिश करते हो इस्पे बात बनती या बिगडती है. आणि हो संत आणि गुरु कितीही मिळाले तरी शेवटी स्वतः परमेश्वरा कडे मोर्चा वळवून स्वतःच तो परमानुभव साध्य करावाच लागतो. संत आणि गुरु तुमचा साठी शॉर्ट कट किंवा बाय पास काढू शकत नाही. ते तुम्हाला योग्य मार्ग दाखवू शकतात , चांगल्या गोष्टी शिकवू शकतात इतकेच.
४) आपल्याला मिळू शकतो देव पण ते अवघड असते आणि गुरुं मुळे ते सोप्पे होते.
उत्तर - असे काहीही होत नाही. असे असते तर सगळ्या संतांनी आणि गुरूंनी त्यांचा शिष्यांना तपश्चर्या, उपासना, साधना , ध्यान आणि सेवा करायला लावल्या नसत्या. थोड्यक्यात काय तर ये प्यास बुझाने के लिये खुद हि कुआ खोदना पडेगा ! गुरु तो सिर्फ खोदने जगह बता सकते हैं. औजार तो तुम खुद हो, लग जाओ काम पे.
क्रमशः
- शंतनू जोशी

No comments:

Post a Comment